रविवार, 5 मार्च 2017

दारोश एस.आर.हरनोट

दारोश
typed by Ashu, need proofreading
मूळ हिंदी लेखक:एस.आर.हरनोट
मराठी अनुवाद: लीना मेहंदळे
काळच्या प्रहरी पेपरात ती अनपेक्षित बातमी पाहून कानमला कळेना ती जागी होती की झोपेत. कशीबशी ती बातमी तिने पूर्ण वाचून काढली .
शब्दाशब्दाला उत्कंठा आणि तळमळ वाढवणारी-चैतन्य आणि उत्साह देणारी बातमी. तिच्या मनावरचं वर्षानुवर्षाचं मळभ दूर करण्याचं सारर्थ्य त्या पाच मिनिटांच्या बातमीत होत. पेपर घेऊन धावतच ती छोट्या पापांच्या खोलीत पोचली. ते बिछान्यातच चहाच्या कपाची वाट पाहत होते. तर समोर कानम आली पेपर घेऊन . त्यांच्या समोर पेपर ठेवत म्हणाली,
"छोटे पापा, आधी ही बातमी वाचा, मीच वाचून दाखवते."
ती बातमी वाचत असताना छोट्या पापांना एक वेगळाच अनुभव येत होता. ही रोजची कानम नव्हती. ती स्तब्ध , आतल्या आंत पोटून उठणारी आणि घुसमटत रहाणारी कानम ही नव्हे. क्षणात एखाद्या सुरवंटांच फुलपाखरू व्हावं तसं तिचं झाल होतं. एक अनोखा विश्वास आणि उन्मुक्तपणा अचानकच तिच्या आवाजातून उमटत होता. न थांबता ती बातमी बाचत होती . इतकी रंगून की छोटी आई चहा घेऊन आत आली आणि दाराशीच थबकून तिची बातमी ऐकू लागली हे पण तिला कळलं नाही. ती वाचतच राहिली.-
"....ती आपल्या मैत्रिणींबरोबर दुस-या गावी शाळेच्या टूर्नामेंट पहायला जात असतानां शहरातील दोन मुलांनी गावातल्यात इतर मुलांच्या मदतीने तिला बळजबरीने उचलून एका झाडीमागे नेलं . मग इतर मुलं तर निघून गेली, पण ज्याला तिच्याशी लग्न करायचं होतं त्याने तिच्या इच्छेविरूद्धच तिच्यावर बलात्कार केला..."
एवढं वाचून कानम थांबली .खोलीत शांतता पसरली होती. सकाळचा सूर्य वर वर चढत होता. त्याची कोवळी किरणं खोलीत आली आणि एक स्निग्ध प्रकाश सगळीकडे भरून गेला. त्याची ऊब कानमला खोलीपर्यंत जाणवली. छोटे पापा आणि छोटी आई अजूनही गप्पच होते. त्यांच्या चेह-यावर भीतीची एक अदृश्य सावली होती. ही सावली आधी कित्येकदा तिने दोघांच्या चेह-यावर पाहिली होती. तिच्या मनातल्या भितीचीच तर ती सावली नव्हती ना? पण आज तिचं मन भयमुक्त झालेलं होतं. खोलीच्या दारातच चहाचा ट्रे घेऊन थबकलेल्या छोट्या आईचा ट्रे घेऊन तिने तिला हाताला धरून छोट्या पापांच्या जवळं आणून बसवलं . मग पुनः पेपर उचलून ती पुढे वाचू लागली.
".... या घटनेनंतर गप्प न बसता मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दाखल केली . हिमालयाच्या कुशीतील कित्येक खेड्यांमधे चालणा-या दारोश या प्रथेविरूद्ध कुणी ब्र काढला नव्हता. पहिल्या प्रथम या मुलीच्या वडिलांनी आवाज उठवला....."
छोटे पापा ताड्कन अंथरूणाबाहेर आले आणि पचकन् चष्मा डोळ्यांवर चढवून कानमच्या जवळ जाऊन पेपरातील बॉक्स आयटम वाचू लागले. त्यांच्याही मनातील शंका आणि भीती ओसरत चालली होती. सूर्यकिरणांनी दिवसाला एक नवीनच उजाळा दिली होता. जणू .
पुढली बातमी कानम अशा प्रकारे वाचू लागली- जणू ती भाषणच देत होती-
"कोर्टाने या घटनेची गंभीर दखल घेतली . स्त्रीजातीच्या सन्मानाविरूद्ध आणि देशातील कारद्याविरूद्ध ही घटना आहे असा निर्णय देऊन बलात्कार करणा-या त्या दोन्ही युवकांना कैदेची सजा सुनावली. बचावाच्या वकीलाचा सामाजिक प्रथेचा युक्तिवाद अमान्य करून स्त्रीची अनुमती, सन्मानव स्वातंत्र यांना सामाजिक प्रथेपेक्षा मोठं ठरवलं .ज्या युवकाने बलात्कार केला त्याला तीन वर्षे कैद व दोन हजार दंड तर त्याला साथ देणा-या युवकाला एक वर्षे कैद आणि एक हजार दंड ठोठावला. न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की मुलीच्या विरूद्ध तिला उचलून नेऊन व तिच्यावर बलात्कार करून तिला लग्नासाठी भाग पाडणारी दोरोशसारखी प्रथा आपल्या समाजात असणे हीच दुर्दैवी गोष्ट आहे. ज्या प्रथेत समाजाला कलंक आहे. त्यामुळे या न्यायालयातर्फे राज्य सरकारला देखील आदेश देण्यात येतो की ही प्रथा संपवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत."
बातमी संपून कानमने आनंदाने पेपरची घडी करून छातीशी घट्ट धरली .
खरंच खडबडून कानमने जाग येण्यासारखी बातमी होती. कानम किंवा छोट्य़ा पापांनी कधीच अपेक्षा ठेवली नव्हती की एखादी मुलगी किंवा तिचे आई वडील अशा प्रकारे न्य़ायालयात जातील. दोघांचे चेहरे आनंदाने उजळले होते. छोटी आई मात्र अजून गुपचूप बसून राहिली होती. चहा कधीच थंड होऊन गेला. होता कानमने आईला हलवत तिला मिठीच मारली. "आई आता चांगला चहा तरी पाज."
छोटी आई जणू दुस-याच जगातून परत आली. ट्रे उचलत आक्रोशाने म्हणाली, "बलात्काराची शिक्षा फक्त तीन वर्षे कैद आणि दोन हजार दंड ? अशा गुन्हेगाराला भर चौकात शूट केल पाहिजे होत."
छोटे पापाच उत्तरले -"ही साधी बलात्काराची केस नाहीये सुमा, धिस इज ए लॅँग ट्रेडिशन...."
"पण त्या मुलीची बेअब्रू आणि छळ तर दोन्हींकडून होणार."
"मला पण कळतयं आई .पण जेव्हा हे परंपरेच्या नावाखाली होत असेल तेव्हा कुणाला तरी पाहिलं पाऊल टाकावंच लागेल की नाही ?मला तर वाटतं धिस इज ए ग्रेट बिगिनिंग!" कानम म्हणाली.
छोटी आई पुनः चहा गरम करून आणायला गेली. कानमला वाटलं आपण भर चौकात जाऊन ही बातमी जोराजोरात वाचावी सगळ्या गल्लीबोळात ऐकवावी. तिला एम्. . च्या परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल गोल्ड मेडल मिळालं त्यापेक्षाही जास्त आनंद झाला होता. जणू काही कोर्टाचा हा निर्णय तिच्या स्वतःच्या बाजूनेच लागला होता.
छोटी आई गरम चहाचा ट्रे घेऊन आली. सर्व चहा पिऊ लागले. कानम म्हणाली,
"तेंव्हा मोठे पापा पण हेच करू शकले असते तर?"
त्या शब्दांनी इतका वेळ भूतकाळाला पलीकडे ठेऊ पहाणारा बांध तुटून पडला. भूतकाळाची सावली एवढी वर्षे त्या तिघांच्या मागे लागली होती. तिला टाळण्यासाठी छोट्या पापांनी कानमला इतक्या लांब शहरात ठेऊन घेतलं होतं . इथे शहरात त्या प्रथेचं भय नव्हतं, तरी भितीने कधीही कानमला किंवा त्याचा पिच्छा सोडला नव्हता. इतर मुलींचा बालसुलभ चंचलपणा कानमला कधीच पारखा झाला होता. तिचा आत्मविश्वास पक्का नव्हता. या शहरातल्या घरांत तसं तिच्यासाठी पूर्ण सुरक्षित वातावरणं होतं छोटे पापा आणि छोट्या आईचा अपार स्नेह होता. तरीही सख्ख्या वडिलांकडून खेड्यात ही सुरक्षा मिळेल की नाही ही भिती कायम लागून राहिली होती .तिच्या मनातलं तुफान कधीच थांबलं नव्हतं . एखादी छोटी गोष्टसुद्धा तिला लागून रहायची .कुणाचे साधे उदगार तिला रडवून जायचे . जणू एखादी नदीच तिच्या उरात दडून बसली होती.
ती नदी म्हणजे कानमच्या मोठ्या बहिणीची आठवण होती. कानमच्या डोळ्यादेखत काही मुलं तिला उचलून घेऊन गेली होती. किती आक्रोश केला होता तिने! आणि लहानगी कानम सोडा, सोडा म्हणत त्यांच्या मागे धावण्यापलीकडे काही करू शकली नव्हती. ती छोटी कानम तिच्या मनातून निघत नव्हती पण आसवांच्या रूपाने मात्र सतत डोळ्यांत उभी रहात होती. स्वप्नातून देखील भेदरलेली कानम उठून बसायची -
'ताई, ताईला सोडा,-पहा, पहा, ताईला कुठे घेऊन चाललेत...' तो दिवस कानमच्या मनातून जात नव्हता , की तिला नीट झोपू देत नव्हता. ती कुणाशी हसून बोलू शकत नसे. रात्री उठून बाल्कनीत उभी रहायची .मग छोटे पापी किंवा छोटी आई गुपचुप तिच्याजवळ येऊन उभे रहायचे . तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला नेऊन झोपवायचा प्रयत्न करीत . मग कानमं झोपेचं नाचक करून पडून रहायची. पापांना तिचं दुःख समजत होतं .पण त्यांच औषध त्यांच्याजवळ नव्हतं !कानमच्या एवढ्य़ा संवेदनशील मनाच काय करायच ते समजत नव्हतं . तिच्या मनातील आग, भीती, आवेग, आक्रोश बाहेर निघायला पाहिजेत. योग्य दिशेने ते निघाले तर ती खूप काही करू शकेल. पण सध्या तरी तिच्या मनाभोवती गडद धुकंच होतं.
कानम एवढी शिकली पण शिक्षणाची तिची वर्ष कशी संपली ते तिचं तिलाच कळलं नाही. दिवस येत आणि जात वरकरणी कानम ते सर्व करीत असे जे शिकणा-या विद्यार्थिनीने करायला हवं,पण मनाने अजून ती त्या दिवसाच्या जवळपासच वावरत होती. तरीही छोट्या पापाना खात्री होती की तिचं मन ऊर्जस्वल आहे. त्या ऊर्जेला उपयुक्त शिक्षण आणि वातावरणं तिला दिलं पाहिजे. तिने उन्मुक्त व्हांव , निरापद वागावं , असं त्यांना वाटायचं आजची बातमी ऐकताना त्यांना वाटल की कानमच्या मनावरील भातीचं सावट पुसलं जातयं. तिच्या आंतरिकं ऊर्जेला झळाळी मिळत्येय. या झळाळीमागे जशी आजची बातमी आहे, तसंच त्यांनी तिला दिलेल शिक्षण आहे, कामनच्या मनाभोवतीचे बांध तुटून पडत आहेत. त्या बांधाच्या सीमा कुठपर्यंत जाऊन भिडतात. माहीत नाही. पण ही जी उन्मुक्तता जाणवत आहे तिचे स्वागत असो.
कामनला त्यांनी अनायास जवळ घेतलं खूप वर्षांत कधी नव्हे ते ती मोकळेपणाने रडत त्यांच्या छातीला बिलगून होती. तिचे डोळे पुसता पुसता ते चष्मा काढून स्वतःचे अश्रूपण टिपत होते .तिकडे छोटी आई पगरात तोंड लपवून स्वतःचं मन मोकळं करून घेत होती.
-याच वेळाने तिघं सावरली. पावसाची सर येऊन गेल्याप्रमाणे सर्वांची मनं मोकळी झाली. होती. छोट्या पापांनी तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिला लांब धरलं आणि खोलवर तिच्या डोळ्यांत पाहिलं जणू त्यांना सांगायचं होतं- कळतायत मला तुझ्या वेदना, भविष्याबद्दलची आशंका , गावातल्या रूढी, त्यात एकटी असहाय तुझी आई, आणखीन काही काही,मग प्रत्येक शब्द तोलून मापून तिला समजावलं-
"बेटे, समाज्याच्या सगळ्या प्रथा नुसत्या कायद्याने किंवा कोर्टाच्या निर्णयाने बदलत नाहीत. समाज्याच्या चालिरितींच्या भिंती खूप खूप उंच असतात. त्यांत कितीही दोष असतील पण त्या मजबूत असतात. त्या भिंती तोडायच्या असतील, कुरीती बदलायच्या असतील तर समाज्याच्या पोटात शिरून काम करावं लागेल. लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल, तरचं तू केलेलं भल्या-बु-यांच विवेचन लोस ऐकलील. मला तुझा अभिमान आहे. तू समाजाचा विश्वास संपादन करू शकशील असं माझं मन मला सांगंत! आता थांबू नकोस."
कानम लक्ष देऊन ऐकत होती.
छोट्या पापांकडे आली तेव्हा कानम सात- आठ वर्षांची असेल . घरादारातील कुणाच्याही रागाची पर्वा न करता आईने तिला शहराच्या ठिकाणी आपल्या धाकट्या दिराकडे पाठवून दिली होती. जेव्हापासून तिच्या बहिणीला गावातल्या मुलांनी उचलून नेली होती. त्या दिवसापासून कानमचं बालपण हरवलं होतं. ती सदा भेदरलेली असायची .कुठे जरा जरी खट्ट झालं की भयकंपित व्हायची घरात येऊन आईच्या आड लपून बसायची. . तिला खाणं-पिणं नकोस झालं होतं. रात्री उठून रडायची-"ताईला उचलून चाललेत पहा! तिला परत आणा." मग ती बराच वेळ थरथर कापत रहायची. तिचं अंग गरम व्हायचं . दिवसासुद्धा घराबाहेर निघायला घाबरायची . आई असेल तिथेच रहायची. तिला मोठ्या पापांच सुद्धा भय वाटू लागलं होतं. घरात आईच्या शिवाय मोठे पापा होते. छोटे पापा दहावी पास झाल्यावर पळून शहरात आले होते. मधले पापा शेतावर राहात.कानमचा मोठा भाऊ त्यांच्या जवळच रहायचा. त्यांच्याकडे घरातल्या शेळ्या मेंढया संभाळायच काम होत. शिवाय दहा- बारा घोडे पण होते. ते शेतावर असले की दोन-तीन दिवसांनी घरी यायचे .पण थंडीचे दिवस आले की दोघंजण काही नोकरांना घेऊन खाली सपाटीच्या गावात निघून जायचे . गरमीचे दिवस आले की मगच परतायचे .
ते तिघं भाऊ होते. कानमच्या मोठ्या पापांनी लग्न केल्यावर खेडयातल्या रूढीप्रमाणे त्यांची बायको आता तिन्ही भावांची पत्नी ठरत होती. छोट्या पापांना हे बहुतेक आवडल नसावं ते पळून शहरात आले होते. तिथे लांबच्या एका नातेवाईकाच्या घरी काम करून त्यांनी अभ्यास पूर्ण केला .तिथेच नोकरी मिळाली आणि लग्न पण केलं .पुनः परतून ते गावाला गेलेच नाहीत.
मधल्या पापांनी मात्र ही प्रथा मान्य केली होती. आणि घतातल्या शेळ्या-मेंढयाची जबाबदारी घेतली होती. दोघा भावांना मिळून दोन मुली आणि एक मुलगा झाला होता. कानम सर्वांत लहान आईने मुलाला मधल्या पापाचं नाव लावलं होतं . दोघी मुली मोठ्या पापांच्या नावे लावल्या होत्या . मोठ्या पापांची ही तक्रार कायम राहिली होती की मुलावर पहिला हक्क त्यांचाच होता, पण या बाबतीत आईने त्यांच ऐकलं नव्हतं.
गावात कानमच्या वडिलांचा दबदबा होता. कित्येक वर्षापासून ते गावाचे सरपंच होते. घरातही त्यांचा दबदबा होताच आईने मात्र काही प्रसंगी तो दबाव धुडकावून लावला होता.
तेव्हा कानमला आईबद्दल थोडसच कळत होतं आता मात्र तिच्या न पाहिलेल्या वेदना जाणवून कानमचं मन भरून येत होतं . तिला नेमकं आठवतं होतं की ज्या मुलांनी तिच्या बहिणीला उचलून नेलं होतं त्यांच्याशीच नातेसंबंध जोडायला आई अजिबात राजी नव्हती. पण मुलीचा प्रश्न होता. शिवाय मोठया पतीची इच्छा . आईला गप्प बसावं लागंलं होतं कानमला त्या सर्व घटना नीट आठवत होत्या.

दारोश
तिच्या बहिणीला उचलून नेल्याच्या आठवड्यानंतर तिच्या घरी काही लोक आले होते. त्यामध्ये दोन तरूणांना कानमने लगेचं ओळखलं होतं. तिच्या बहिणीला उचलून नेणारी हीचम मुलं होती.
त्यांच्या बरोबर एक वयस्कर माणूसं होता. त्यांना पाहिल्याबरोबर कानम ओरडली.
पण मोठ्या पापांनी तिथल्या तिथे जोरदार थोबाडीत मारून तिला गप्प केलं होतं. त्या थप्पडची आठवण कानमच्या मनाच अजून आहे. तेवढया लहान वयातही तिला त्या थपडेचं कारण समजलं होतं . तिच्या मनातलं दुःख आणि भीती अधिकच ग़डद झाली होती. मोठ्या पापांबरोबर त्या लोकांनी कितीतरी वेळ गप्पा केल्या होत्या. कानम दाराआडून ऐकत होती. वयस्कर माणूस मध्यस्थी करायला आला होता. नात्याने त्या मुलाचा मामा पण होता. आणि पळवून आणलेल्या मुलीला सध्या त्याच्या घरीचं ठेवलं होतं . बोलता-बोलता तो मोठ्या पापांचे पाय धरायचा. कधी त्यांच्या दाढीला हात लावायचा. तर कधी टोपी काढून त्यांच्या पायावर ठेवायचा. बराच वेळ हा खेळ चालल्यानंतर त्याने आपल्या खांद्यावरील झोळीतून दारूची मोठी बाटली काढली. त्यासोबत लोण्याचा एक डबा आणि पाच रूपये! ही भेट पापांनी स्वीकार केली! नसती केली तर त्याचा अर्थ निघाला असता की मुलींच लग्न त्या घरांत करायला ते तयार नाहीत. आईने तसं सांगून पाहिलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही.
एवढं झाल्य़ावर मध्यस्थाने त्यांना गळामिठी मारली . दोन्ही तरुण त्यांच्या पाया पडले त्यापैकी भावी जावयाला उचलून मोठ्या पापांनी पोटाशी धरलं.
मध्यास्थाने शकुनाचे रूपये फक्त पापांनाच दिले नव्हते . मंदिरात देवीच्या पूजेसाठी पण दिले होते. दुस-या दिवशी मंदिरात सर्व गाव गोळा झाला. सगळ्यांनी पिण्यासाठी दारूच्या बाटल्यांची तोंड उघडली! नाच-गाणं झालं. शेवटी देवीचा कौल पण मिळाला. कधी कधी हा कौल मिळण कठीण होऊन बसत . मोठ्या पापांना माहित होत की जरी वधू पक्षाने शकुनाचे पैसे , दारू आणि लोणी ठेऊन घेतले असले तरी कौल न मिळाल्यास लग्न फिसकटतं .पण पापा गावाचे सरपंच होते . शिवाय मंदिर कमिटीचे चेअरमन देखील. कौल लागल्यावर ते लोक परत गेले.
काही दिवसांनी मधले पापा त्यांच्या घरी गेले. परत आले तेव्हा सुमनपण त्यांच्याबरोबर होती. कानमला त्याक्षणी केवढा आनंद झाला होता. ती धावत जाऊन सुमनला बिलगली. तिला रडू पण येत होत आणि हसूपण. सुमन मात्र अगदी गप्प होती. कानमने तिलां इतकं उदास कधीच बघीतल नव्हतं . तिचे ओठ सुकलेले आणि चेहरा उदास दिसत होता. डोळे लाला आणि सुडलेले होते . तेच सांगत होते की कित्येक रात्री तिने जागून रडून काढल्या आहेत. आज कानमला कळतयं की तिला खुप काही सांगायच होत - तिच्यावर काय काय प्रसंग बेतले होते ते- पण वयाचं अंतर आडवं येत होतं कानम अजून मुलच होती. तिला काय सांगणार आणि कसं सांगणार?
किती सुंगर होती सुमन , आणि किती चंचल जणू उत्साहाचा धबधबाच! मोठे काळे डोळे ,सदोदित खळखळून हतस रहायचे. ओठांवर गुलाबी हसू आणि गुणगुणायला गाणं! हिमाचल प्रदेशातील नाटीनृत्याची सगळी लोकगीतं तिला तोंडपाठ होती. सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची . खोडया काढायची . लहान असो की मोठा , सर्वांना हसत ठेवायची. पँ आज ती दगडाची मूर्ती झाली होती. कुणाशी बोलण नाही, हसणं नाही.गुमगुणनं नाही, मस्ती नाही. कानम विचार करून दमली. त्या गुंडांनी काय काय केलं असेल तिच्याशी?
ती दगडी अबोल मूर्ती कानमच्या मनावर कायम कोरली गेली.
त्यानंतर विवाह-विधी सुरू झाले आणि कितीतरी दिवस चालूच राहिले. लग्नात तोच नवरा मुलगा बनून आला होता. कानम आडून आडून त्याला पाहत होती. सगळे दिवसं नाच-गाणी, दारू आणि खाणं! बायकापोरांसकट सगळे त्याच वातावरणच होते आणि कानम मात्र एकटी पडली होती. आईच तिला शोधून काहीतरी खायला घालायची. दुस-या कोणाला तिची पर्वा होती? लग्नानंतर सुमन नीघून गेली. यावेळी तिला सोडून गेली ती परत पुनः न येण्यासाठीच. तिला रडू पण आलं नाही. कामनलाही घरात बसवेना. वरात निघायच्या वेळी ती पळून शेताच्या बांधावर जाऊन बसली . लांबूनच वरात जाताना पहात राहिली. सायंकाळी आईच तिला शोधत आली नसती तर तिथेच बसून राहिली असती. आता ती अगदीच गप्प झाली होती. तिच्याकडे पाहून आईच्या डोळ्यांतले पाणी खळतं नव्हत. शेवटी मोठ्या पापांच्या विरोधाला न जुमानता तिने कानमला शहरात पाठवून दिलं होतं . त्यानंतर आईला काय सहन करावं लागलं असेल तिला माहीत नाही. पण कल्पनेच तिचा थरकापं उडत असे.
मधे इतकी वर्षे निघून गेली .कानम अभ्यासापूरती वर्तमानकाळातच असे. एरवी भूतकाळात.
तिच्याइतकी शिकलेली मुलगी आज गावात काय पण दूरदुरच्या शहरापर्यंत देखील नाही. आईने विचार केलेला असतो- कानम शहरात जाईल. तिथेच राहिल. नोकरी करील. तिने लग्न पण स्वतःच जमवून घ्यावं . फिरून भूतकाळातल्या त्या गावात, समाजात राहून जे सहनं करावं लागलं, आणि जे गावातल्या इतर मुलींना सहनं करावं लागतयं ते कानमच्या वाटयाला येऊ नये. तसं आता गावं तरी कुठे टिकून राहतयं ? प्रत्येक घरातील एक दोन मुल बाहेर पडतातच. कुणी कुणी मोठे ऑफिसरपण झालेले आहेत. पण त्यांनाही गावातल्या त्याच रूढी लागू आहेत. कुणी ऐकणार नाही म्हटलं तर त्याला गावचे, , घराचे रस्ते बंद होतात. मंदिरातला देव पण त्याच्याविरूद्ध कौल देतो. गावात काळ जणू थांबलेल्या आहे. वर्षानुवर्षें चालत आलेल्या परंपरा तशाच आहेत . आज आणि वीस वर्षापूर्वीच्या गावात काहीच फरक नाही. काहीच सुधारणा नाही.
पण एक दिवस कानमचं पत्र पाहून ती आश्चर्यात बुडून गेली. पत्रात लिहंल होतं- आई मी तुझ्याजवळ परत येत्येय. आईला वाचता येत नव्हतं. पण शेजारच्या मुलाकडून वाचून घातलं होतं पत्र. मजकूर ऐकून क्षणभर आनंदी झालेलं मन दुस-या क्षणी आशंकेनं व्याकूळ झालं. ज्या वातावरणातून काढुन तिला बाहेर पाठवलं ,तिथे ती परत का येत्येय? वाचणा-या मुलाला तिने दहादा बजावून सांगितल की ही बातमी कुणाला सांगू नकोस. पण गावात हे लपून रहाणं कसं शक्य होतं?
आईची व्दिधा मनस्थिती झाली. मोठ्या झालेल्या कानमला डोळे भरून पहाण्यासाठी मन आसुसलं होतं, पण इथल्या परंपराच्या पिंज-यात तिने परत येऊ नये असही वाटतं होत. पोरगी वेडावली आहे, का येत्येय या वातावरणात परत? काय उपयोग इतकं शिकवल्याचा? इथला प्रपंच , इथला समाज तिला लगेच गिळून टाकेल. कुणी ती सांगा माझा निरोप येऊ वकोस म्हणून!
पण आई हे सर्व कुणाला सांगणार? मोठ्या पापांनी ऐकलं तसं रागाने लालीलाल झाले. घरी येऊन आईवर ओरडले- "कशाला येत्येय इथे? आधी केलेला तमाशा काही कमी होता का? आता येऊन काय दिवे लावणार आहे! तूच बोलवलं असशील तिला. पण शहरातले थेर इथे चालणार नाहीत. सांगून ठेवतो. पोरगी काही तरी करून बसेल आणि समाजात तोंड दाखवायला जागा रहाणार नाही."
आई काय बोलणार? तिच्या मनाची भीती आणखीनच वाढली. काही तरी अनिष्ट होणार नाही ना या शंकेने तिचं मनं व्याकुळ झालं.
पम दुसरं मन डोळ्यात प्राण आणून कानमची वाट पाहू लागलं. कधी येईल ? कुणाबरोबर येईल ?इतकी मोठी झाली असेल, आपल्याला ओळखेल का? छे:कितीही प्रयत्न केला तरी जी कानम डोळ्यासमोर येते ती तीच- आठ वर्षाची , अबोल, घाबरलेली कानम आहे. कितीदी तिच्यासाठी कुलदेवीचं स्मरण करून झालं!
छोटे पापा आणि छोटी आई कानमला बस मध्ये बसवून द्यायला आले होते. पुढे तिला एकटचं जायच होत. गेल्या काही दिवसांत ती किती बदलली होती. अचानक एक वेगळी दृढता आमि निश्चय तिच्यात निर्माण झाला होता.
बस निघाली . शहर मागे पडलं.मनातूनसुद्धा! तिथे फक्त शिल्लक राहिली होती, आईची आठवण! गावही आता बदललं असेल का? पूर्वी बसेस नव्हत्या . आता सगळ्या गावांमध्ये रस्ते झालेत. तरी शगराइतकी गर्दी, आवाज, प्रदुषण नसणारच. नदीनाले असणार, मोठं घर-आंगण असणार, मोकळी हवा, मोकळं वातावरणं- तरी परंपरेच्या सीमांनी बांधून , घुसमुटुन टाकणारं ! रस्त्याला लागून जागोजागी सिमेंट कॉंक्रीटची घरं उगवत होती. पावसाचे दिवस पहाडांत जागोजागी दरडी कोसळून रस्ते बंद पडत होते बराच वेळ बस थांबून रहायची, कित्येक बोर्ड लागलेहोते- "शिळा पडतात, सावधान!"
तरीही त्या रस्त्यांवर अपघाताचे संकट समोर ठेऊन मजूर काम करत ह होते. ज्या दरडी कोसळतात त्या चुकीच्या डायनामाइटिमगमुळे किती आणि प्राकृतिक कारणांसाठी किती हाही विचार तिच्या मनात येऊन गेला. खेडी म्हटलं की तिथली टेकनॉलॉजी नेहमी सब-स्टॅण्डर्डच असली पाहिजे का?
कानम गावी पोचली ती तो दिवेलागण झाली होती. जवळपासच्या गावांतून बसमधे चढलेली माणसं तिच्याकडे आश्चर्याने पहात होती. एक दोन तरूणांनी काही छेड काढायचा बेत केला होता पण तिच्या कठोर चेह-याकडे बघून त्यांनी ते प्रयत्न सोडून दिले होते.
घरी पोचत्ये तो कुत्र्याने भूंकून सगळ्यांना सूचना दिली. मोठ्या पापांनीच दार उघडलं होतं. आई चुलाण्यावर फुलके शेकत होती.. कानमला पाहून तिच्या आनंदाला पारावारा उरला नाही. किती मोठी झाली कानम! ती लहानगी भेदरलेली मुलगी आईच्या डोळ्यातून मनातून कुठल्या कुठे गडप झाली . आईनेच ओरडून कुत्र्याला गप्प केलं . वडील बघतच राहिले. मग जसं पक्क झालं की ही कानमच आहे , तसं अजिबात थांबले नाहीत. बाहेर निघून गेले, जणू काही शेजारपाजारची कुणी मुलगी, काही तरी मागायला आली होती.
आई क्षणबर समोर येऊन थबकली. मग एकदंम तिला कवटाळून घेतलं, तसचं पाठभरल्या हातांनी! तिच्या शहरी चालीरीती बाजूला ठेऊन कानमदेखील आईला बिलगली. दोघींचे डोळे मुकपणे अश्रु ढाळत होते. आईला तरी घरात स्वतःच ्सं कुणी उरलं होतं का ? तिला थोडं लांब करून आईने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. डोळ्यांनी दोघी बोलू लागल्या.
मधेच कानमला जाणवलं. वडील अजून बाहेरच थांबले होते, त्यांना पम वाकून नमस्कार करावा , मग ते आपल्याला उचलून जवळ घेतील ही कल्पना तिच्या मनात तशीच राहिली ,मधले पापा येऊन तिला आशिर्वाद देऊन गेले, पण आई किंवा छोटे पापांसारखी आपुलकी त्यांच्यात कानमला जाणवली नाही.
बूट काढून आपली सुटकेस उचलून कानम आत ठेवायला गेली तो दारात अवघडून बसलेला कुत्रा तिला दिसला. तिच्याकडेच पहात होता. कानमने त्याला जवळं बोलावलं. तो आलाआणि क्षणात कानमचा होऊन गेला. आईपण आश्चर्यचकित झाली. मगाशी याला किती रागवून गप्प करावं लागलं होतं . मोठे पापा लांबून बघत होते.या कुत्र्याच्या भीतीने चिमण्या देखील अंगणात येऊ शकत नसत.
कामनने ठरवलं इथे शहरी संस्कृतीच्या तो-यात राहून चालणार नाही. तसंच गावाची नसती बंधन लादून घेण्याची पण गरज नाही. दुस-या दिवशी सकाळीच उठून ती ग्रामदेवता चंडिकेच्या मंदिरात गेली. सोबत आईपण होती. मंदिराबाहेर बराच वेळ उभी राहून ती तिथल्या शिळांवरची वर्णनं वाचत राहिली. पुजारी या अपरिचित शहरी मुलीकडे बघतच राहिले. आईच म्हणाली -
"ओळखलं नाही का? आपली कानम आहे. कानम!"
ओळख पटली. या मंदिराच्या प्रांगणात पूर्वी कितीदा येऊन खेळली होती छोटी कानम! त्यांच्या चेह-यावर वात्सल्याचे भाव होते. पण क्षणात ओसरले, तिचा अपराध आठवला असावा. कानम पुढे येऊन त्यांच्या पायाशी वाकत असतानाच ते झचकन आत निघून गेले.
आई क्षणभर अप्रतिभ झाली पण कानमच्या ओठांवर हसू बघून पुनः सहज झाली.
मंदिरात जाऊन कानमने देवीला मनस्कार केला. फूळ, नारळ आणि पैसे ताटात ठेवले आमि बाहेर परत आली. पुजा-याची समस्या तात्पुरती तरी सुटली की या कुलक्षणी मुलीली काय आशिर्वाद द्यायचा.
आई गंभीर होत चालली होती. कानम तिला घेऊन आपल्या शेताच्या बांधावर येऊन बसली. म्हणाली,"माहित आहे ना मोठी आई, हे मंदिर किती जुनं आहे ते?"
आईने मान डोलावली. त्याच अर्थ काहीही लावता आला असता. पण कानमने तिकडे दुर्लक्ष केलं. भारावल्यासारखी ती बोलत राहिली-
"ही देवी आपल्या हिमालयातली सगळ्यात संपत्तीवान आणि चतुर देवी मानली जाते आणि सगळ्यात शक्तिवानपण! का तिला इतका मान, इतकी पूजा मिळते माहित आहे का?"
आई अजूनही विस्मयाने तिच्याकडे पहात होती.
"असं सांगतात की बाणासूराची मुलं-मुली मिळून एकूण अठरा संतती होती. त्यांनी हिरमेशी जबरदस्तीने विवाह केला होता. व तिला घेऊन एका गुंफेत रहात होता व तिला घेऊन एका गुंफेत रहात होते. मग मुलं मोठी झाली. हा त्यांचा प्रदेश मुला-मुलींमधे वाटून द्यायचा होता. भाऊ मोठे होते. त्यांनी चांगल्या उत्पन्नाच्या प्रदेशांवर आपला हक्क सांगितला पण चंडिका लहान असूनही त्यांना बधली नाही. तिने विद्रोह केला. युद्ध केलं आणि आपल्याला हवा तो प्रदेश जिंकून घेतला."
आई ऐकत होती.
"बाणासूर गुंफेत रहात असताना त्या प्रदेशावर एका राक्षसाने कब्जा केला होता. तोही फार शक्तीवान होता. पण चंडिकेने युद्धात त्यालादेखील ठार केल. त्याच्या कित्येक सहका-यांना कैद केलं. अशा त-हेने एका विस्तीर्ण प्रदेशावर तिने आपलं राज्य स्थापन केलं. म्हणूनच आजही ही देवी आपल्याला पूजनीय आहे."
"जय हो‍!" असं म्हणत आईने पुनः एकदा मंदिराच्या दिशेने हात जोडले.
"मी पण या चंडिकेचीच वंशज आहे."
आई एकदम दचकून तिच्याकडे पहात राहिली.
"तुझ्या डोळ्यांत जी खूप वर्षापूर्वीची कानम आहे, ती तिला विसर मी आजची कानम तुझ्यासमोर उभी आहे. मला तुझा आशिर्वाद असू दे आणि या चंडिकेचापण."
आई क्षणात सावरली. कानमच्या डोळ्यांतील आत्मविश्वासाची चमक तिच्या डोळ्यांतपण उतरली.
"मी नोकरी करण्यासाठी शिकले नाही. मला नोकरीची गरज नाही,मी तुझ्याजवळ राहीन. तुझी कांन करीन ही हिम्मत आणि विश्वास तुझ्याकडूनच उतरला असणार माझ्यात!"
आईने तिला हळूवारपणे जवळ ओढलं- "यशस्वी हो बेटी, आयुष्यमान हो!"
कानम सकाळी लौकर उठून कोंबडा आरवण्याच्या आतच लांबपर्यंत पळायला जायची. परत येऊन अंगणात थोडा व्यायाम करायची आई आता तिच्या बद्द्ल निश्चिंत होती. आईच्या प्रत्येक कामात कानम मदत करू लागली.
आधी आई एखांद मशीन असल्यासारखी अविरत कामात बुडलेली असे. सकाळी चारपासून तिची कांम सुरू होत. गोठ्याची सफाई ,मग दुधं काढणं , सगळ्यांना चहा देणं, मग गाई- बक-यांना चारा देणं, मग शेतात किंवा जंगलात जाऊन हिरवा चारा कापून आणणं, मग दुपारचं जेवणं, पुनःगुरांना थोडसं चरवून आणणं, की लगेच संध्याकाळची तयारी, पुनः दूध काढणं, चारा, आलं- गेलं! संध्याकाळी वडिलांकडे गावची माणसं येऊन बसत. दारू पिणं सुरू होई. त्यांना अधनं-मधनं काहीतरी खायला द्यांव लागे. सगळ्यांचच उरकल्यावर कधीतरी आई स्वतःची थाळी पुढे घेऊन चार घास खाऊ शकायची शिवाय शेतातल्या धान्याची वाळवण, फळांची आवक, त्यांचे तुकडे करून सुखवणं आणि साठवणं. गावात गिरणी नव्हती. चार कोस लांबच्या गावातून धान्य दळून आणायचं काम पण आईकडेच होतं. शिवाय गावातले उत्सव, सणवार, लग्नसमारंभ अशा प्रसंगी ढोलक वाजवणं आणि इतर स्त्रियांबरोबर रात्रभर नाटीत जाऊन नाचणं हे पण आई करू शकायचीय शिवाय आठवड्यातून एकदा द्राक्षांची दारू पण करावी लागत असे. आणि तशात दोन दोन पती.
-हे करत असताना ती दमत कशी नाही? नक्कीच देवीची काहीतरी मेहरबानी असणार!
मोठे पापा मात्र कानमवर चिडून होते. कुठून ही दळभद्री लक्षणांची पोरगी घरात येऊन पडली! तिने मुलांसारखा व्यायाम करावा, पळायलां जावं, उन्मुक्तपणे वावरावं, सर्वांशी हसून-खेळून बोलावं हे त्यांना नकोस झालं होतं. गावातली त्यांची इज्जत पणाला लागली होती. त्यांच्याकडे दारू प्यायला येणा-या काही मंडळींनीपण बोलून दाखवलं होतं. ते कानमला पूर्णपणे टाळत असत. मधले पापा निदान घरी आले की विचारपूस तरी करत.

दारोश
मोठ्या पापांचा कानमवरचा राग मग आईवर निघत असे. ते देखील कानम झोपली असेल किंवा बाहेर गेली असेल तेंव्हा. कानम आता गावातील इतर मुली आणि स्त्रियांच्या घोळक्यात त्यांच्यातलीच एक बनून राहिली होती. तिच्या शिक्षणाबद्दल आणि उन्मुक्त वागण्याबद्दल बोललं जायचं , पण जरा जपूनच! काही झालं तरी शेवटी ती गावच्या प्रधानाची मुलगी होती.
एरवी कानमचा वेश साधासाच असे. साधा सूती सलवार, कुर्ता, वर लोकरीची बंडी आणि गावी आल्यापासून हिरव्या पट्टीची लोकरी टोपी. तिचं सौंदर्य आणि प्रतिभा दोन्हीं खुलू लागलं होतं. गावातून ती येत जात असताना लोकांच्या नजरा तिच्याकडे आकर्षित होत. कित्येक तरूणं मुलांच लक्ष तिच्यावर राहू लागलं.
एक दिवस भल्या पहाटेच ती उठून त्या गावी जाऊन आली जिथल्या मुलीने आणि पालकांनी कोर्टात केस केली होती. तिला तिथे कोणीच ओळखत नव्हतं. विचारत विचारतचं तिने घर शोधून काढलं. सर्वांना आश्चर्य वाटलं. तिचा येण्याचा उद्देश कळल्यावर घरच्या लोकांनी तिला मोठया प्रेमानं बसवून घेतलं. गप्पा केल्या .पण त्या मुलीला भेटल्यावर मात्र कानम् आवाक् झाली. पोरगी अगदी सुकून गेली होती. फारसं कुणाशी बोलत नव्हती की नीट खात-पीत नव्हती .केस जिंकल्याचा अभिमान कुठेच नव्हता. उलट आयुष्यातून उठल्याचीच भावना होती. कानमने तिच्या वडिलांना म्हटलं-
"मी तर विचार केला की ही केस करून तुम्ही समस्त स्त्रीजातीचा मान वाढवला आहे. म्हणून तुमचे आभार मानायला आले होते."
मुलीच्या वडीलांनी एक दिर्घ निःश्वास सोडला. आतून ते तुटून पडल्यांच स्पष्ट जाणवतं होतं.! म्हणाले, "मुली, आता वाटतं की आपण मोठी चूक केली. त्याची शिक्षा भोगतोय, मुलीलापण भोगावी लागत्येय."
कानमला या उत्तराची अपेक्षा नव्हती."असा का विचार करता? आपली केस ही खरोखर एक धीर आणि दिलासा देणारी घटना होती."
"अस बोलणारी तू पहिली मुलगी आहेस. कारण तुला अजून समाजाची ओळख नाही. आमची सर्व नातीगोती आणि व्यव्हार बंद झाले आहेत. मुलीच्या लग्नाच्या गोष्टी कुठेच करता येत नाहीत. आम्ही एकटं समाजाशी कसं लढणार? पहा या मुलीकडे! चुलीजवळ गुडघ्यांत तोंड खुपसून रडत असते. कुणाकडे पाहून धीर धरायचा आम्ही?"
कामने पुष्पाला, त्या मुलीला, जवळ बसवून घेतलं. तिच्यासाठी कानमचं मन भरून येत होतं. कसा आहे आपला समाज ! अत्याचार सहन केला असता तर त्याचीच पत्नी म्हणून जगावं लागलं असत. आणि विरोध केला तर बलात्काराचा कलंक माथ्यावर वागवावा लागत आहे. या समाजाला तिला तिरस्कार वाटू लागला. जणू हे सर्व तिच्याच बाबातीत घडत होतं.
काहीशी निश्चयाने ती उठली -
"हिला मी थोडे दिवस माझ्याबरोबर घेऊन जाते. हिला पुनः पहिल्यासारखी हसती-बोलती केली पाहिजे . तुम्ही हिची काळजी करू नका!"
कामनने कोणाला न विचारताच आपला निवाडा देऊन टाकला. तिला विरोध करावासा कुणाला वाटलं नाही.
कानमसोबत अजून एका अनोळखी मुलीला पाहून मोठे पापा क्रुद्ध झाले. त्यांना कळलं की ही तीच मुलगी आहे. कामनला काही न बोलाता तिच्यासमोरच त्यांनी आईशी भांडण काढलं. आई काही व बोलत गप्प बसली.
ही बातमी गावात व दूरच्या गावांतही वा-याच्या वेगाने पसरली. त्यांत ती मुलगी थोड्या खालच्या जातीची होती. लोक येता जाता कामनच्या वडिलांना विचारू लागले. आजपर्यंत कुणाला मान वर करून त्यांच्याशी बोलायची हिम्मत झाली नव्हती. आज मुलीपायी काय करू , कसं थांबवू ! ही त्यांच्यासाठी एक आफत बनून परत आली होती. त्यापेक्षा मेली असती तिकडे दूर शहरात तर काय वाईट होतं?
पण एवढं असलं तरी त्यांना कधी कानमशी स्पष्ट बोलण्याची हिम्मत झाली नाही. कानमला पण खुप वाटायचकी त्यांनी एकदा तरी आपल्याशी नीट बोलावं पण ते झालं नाही.
तिच्याबरोबर राहून पुष्पा मात्र हळू हळू तिच्या नव्या विचारांबरोबर रूळायला लागली. कानमला वाटलं जणू आपली खूप वर्षांपूर्वीची हरवलेली बहिणच परत मिळाली.
काही दिवसांनी फुलांचा उत्सव जवळ येऊन ठेपला. कानम व मोठी आई दिवसभर घराची रंग-सफाई करण्यात व्यस्त रहात. घरकाम संपवून, गावातल्या इतर बायकामुलींबरोबर टोळीने गावाजवळील जंगलात जाऊन फुलं गोळा करून आणत. मग आई त्यांचे हार, शेले बनवत असे. हल्ली फुलं आणणं हेच कानमचं मोठ काम झालं होतं.
एकदा अशीच एक मुलींची टोळी गावाकडे निघाली होती. पहाडावरून खाली उतरून गावाबाहेर जाणारी सडक पकडताना कानमने वळणावर एक पांढरी मारूती उभी असलेली पाहिलं.पण कुणी विशेषं लक्षं दिल नाही. चारपाच तरुणं मुलं कारजवळ उभी होती. काही कळायच्या आतच या मुलींजवळ ते येऊन ठेपले. ज्या मुलींनी निघून जायचा प्रयत्न केला त्यांना त्यांनी जाऊन दिल. सगळ्यांना कळून चुकलकी त्यांचं लक्ष्य कानमच होती. पुष्पालापण हे समजलं . तिने कानमला मिठी मारली.पण एका मुलाने हिसका देऊन तिला बाजुला केलं. मग त्यांतील एका मुलाने कानमचा दंड धरला आणि तिला ओढत मारूती कडे नेऊ लागला. इतरही मुलं तिला ओढू लागली. पण संकेत स्पष्ट होता. ज्या मुलाने तिचा दंड धरला होता तो तिला घेऊन जाणार होता.
पण कुणाला काही कळायच्या आगोदरच कानमने स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवलं होतं. त्यांनंतर बुक्के, डोकं आणि लाथा यांच्या मा-याने ती सगळ्यांना बडवत सुटली. पुष्पाला पण जमेल तसं तिला साथ देऊ लागली. ज्या मुलाने दंड धरला होता त्याची कॉलर पकडून त्याला उचलत कानमने असा झटका दिला कि तो दूरवर जाऊन पडला. तो उठायच्या आत कानमची उडी त्याच्यावर पडली आणि ती त्याला लाथांनी तुडवू लागली. पुढे गेलेल्या इतर मुली व बायकाही आरडाओरडा करत परत य़ेऊ लागल्या. त्याबरोबत इतर मुलांनी मारूतीमधे बसून पळ काढला. मोठया बायकांनी कानमला आवरलं नसत तर त्या मुलाचा जीवच घेतला असता तिनं.
इतकी ताकद कानमकडे कुठून आली याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतं होतं.या भांडणात तिच्या एका कानाची रिंग ओढली जाऊन कानाची पाळी फाटली होती आणि रक्त वहात होतं. तिचा कुर्तापण फाटला होता. पुष्पाने आपली शाल तिच्यावर पांघरली. एका मुलीने खाली पडलेली टोपी उचलून तिच्या डोक्यावर ठेवली. कानम शांत होत चालली होती.पण मधूनच डोळ्यांच्या कोप-यातून त्या मुलालाही पहात होती. अजून थोडा वेळ मिळाला असता तर अजूनही त्याची मरम्मत करायला हवी होती.
त्या दिवशी कोणीच जंगलात फुलं आणायला गेल नाही. सगळ्या जणी कानमबरोबर गावी परतल्या. गावागावात संध्याकाळपर्यत ही बातमी पसरली.
मोठे पापा तालुक्याच्या गावी गेले होते. परत आले ते रागाने बिथरलेलेच होते. विषारी नागाप्रमाणे फुत्कार टाकत होते. त्यांत दारूचा अंमलपण होताच .
आधी आईला बरचं बोलून घेतलं. मग कानमकडे मोहरा वळवला. तीपण आज समोरच थांबली होती. एक जोरदार थप्पड तिच्या गालफडांत मारली पण कानमला वडिलांचा तो स्पर्शदेखील क्षणभर हवाहवासाच वाटला. चेह-यावरचं हसू कायम ठेवत ती म्हणाली,
"मोठे पापा, मी सुमन नाहीये की चार गुंड पोर येतील आणि उचलून त्यांच्या खुंटयाला नेऊन बांधतील. मी कानम आहे कानम!"
पापांचे डोळे लाल झाले होते. आई दाराला चिकटून घाबरून उभी होती.
"कुलक्षणी मस्तवाल कुठली. तुला कळतयं का काय केलं आहेस ते मी या गावाचा आणि इलाख्याचा प्रधान आहे. प्रधान! आता काय तोंड दाखवू मी त्यांना? थुंकतील लोक माझ्यावर! जन्मताच का नाही मारून टाकलं मी तुला?"
मग कानमच्या आईला ओढून खोलीत घेत म्हणाले,
"पाहिलसं या पोरीने पुरती बेइज्जती केली ते! शिवाय आता इलेक्शन जवळ आलेलं."
मुलीच्या अब्रुपेक्षा मोठ्या पापांना इलेक्शन जास्त प्यार आहेत! आणखीन काय अपेक्षा ठेवायची अशा बापाकडून! कानमला रहावलं नाही.
'पापा, स्वतःच रक्षम केल्याने कशी बेइज्जती हेते? तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की पोरीने स्वतःची अब्रु वाचवली."
"म्हणे अब्रु! होतीच कुठे तुझी अब्रु जी आज वाचलीस. तरी मी बापाचं कर्तव्य पार पाडायचा प्रयत्न केला. चांगल्या घरात पडली असतीस. तो एम्. एल्. ए चा मुलगा होता.... माहीत आहे?"
कानमचा चेहरा विवणं झाला. पायाखालची जमीन सरकत्येय असं वाटलं. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की प्रत्यक्ष बापच हे घडवून आणेल.
पण आता तिच्या आईच्या चेह-यावरची भीती पार जाऊन त्या जागी त्वेष भरला होता. पापांच्या सद-याची कॉलर पकडून झटका देत ती ओरडली -"तर ही तुझीच लावलेली विषारी वेळ होती! स्वतःच्या मुलीला बाजीला लावलंस? धन्य हो बापा..."
कानमने तिला सांभाळल नसतं तर ती दुःखावेगाने अंगणातल्या दगडांवर कोसळली असती . कानमला आयुष्यात पहिल्या प्रथमं वाटल की ती मोठ्या पापांची मुलगीच नव्हती. कधीच नसावी. नाही तर ते असे वागले असते? आज सख्खा बापच तिच्या नजरेत केवढा छोटा झाला होता. तिला लाज वाटली.
कितीतरी वेळ अंगणात एकमेकींच्या गळी पडून मायलेकी रडत राहिल्या. मोठ्या पापांची बडबड अजूनही चालूच होती. शेजार-पाजारच्या घरातली माणसं छतावरून तमाशा पहायला गोळा होत होती. कानमने उठून जळत्या नजरेने सर्वांना पाहिलतसं लोक हळूहळू घरात जाऊ लागले.
आई रडत होती, तशीच आनंदली पण होती. आज तिची दुसरी मुलगी अत्याचारापासून वाचली होती. एक भीती जी मनाच्या कोप-यात कायम वसत असे ती आज संपली होती.
आज कानमला छोटे पापा आठवत राहिले. त्यांच्या विषयी कृतज्ञतेने मन भरून आलं. आणि छोटया आईसाठी पण .तिनेच जबरदस्तीने कानमला मार्शल आर्टच्या क्लासला घातली होती. जणू आजच्या दिवसासाठी ते प्रशिक्षण दिलं होत.
दुर-दुरच्या गावांपर्यंत बातमी पोचली की कानमने एम.एल. ए च्या मुलाला मारून अर्धमेला केलयं. मोठी माणसं परंपरेचा नाश होतोय् म्हणून आक्रोश करत होती. पण कित्येक तरूण मुलं, मुली आणि स्त्रियांना झालं तेच योग्य अस वाटत होतं. ज्यांना कानम कुठल्याशा निमित्ताने आधी भेटली होती त्यांना तिच्य़ाबद्दल आदर आणि ममत्व वाटू लागलं. पण कानमला त्याने संतोष वाटत नव्हता. जी ममता आणि आदर घरात मिळायला हवा तो तिथूनच मिळत नव्हता. मोठ्या पापांना कधीच कानम आपलीशी वाटणार नाही का? पंचायत इलेक्शनांचा मोसम सुरू झाला. घरी- दारी तीच चर्चा. कानम विषादाने पहात होती- शहरातले निवडणुकींचे प्रपंच आणि विषारी वातावरण इथे गावातं पण होतं. तिच्या घरात कायम दहा-बारा लोक घुसून बसलेले असायचे. मोठया पापांकडे पैसा आहे, विड्या-सिगरेंटींची बंडंल आहेत, दारू आहे, बक-यांचे मटण आहे, आई दिवसभर त्यांची काम उपसायला आहे.
घरातल्या कामांना कानम नाही म्हणत नसे. पण या कामाला हात लावायची ती तयार नव्हती. आईलापण अडवायची.पण आई म्हणायची की ती फक्त आई नाही. , पत्नीपण आहे .मग कानम निरूत्तर होत असे. आईचा संसार घराच्या आतच आहे, कानमचा भले असेल उंबरठयाबाहेर!
निवडणुकीचं नामांकन पत्र भरायचा दिवस आला. सगळ्यांत पहिला फॉर्म मोठ्या पापांनी जाऊन भरला. आहे त्यांना विश्वास आहे कि पूर्वीप्रमाणेच याही वेळी इतर कुणी फॉर्म भरणारच नाही. भरला तर जिंकणार नाही. देवीमंदिराचे चेअरमनपण तेच आहेत... पंचायत त्यांची, लोक त्यांचे , देव त्यांचेच!
कानम आणि पुष्पा चंडिकेच्या मंदिरात गेल्या .पुष्पा बाहेरच थबकली. ती दुस-या गावची आहे, आणि छोट्या जातीची. या देवीकडे तिला प्रवेश असेल की नाही ?
"बेटी, देवीचा आशीर्वाद, अक्षता आणि फुलं तर घेऊन जा!"
पुजा-याने खाली कुंकुमाक्षत आणि फुलं ठेवली. मंदिरातून निघून कानम सरळ शाळेच्या आवारात येऊन पोचली. तिथे उगीचच गोळा झालेली मंडळी तिला पाहून इकडे तिकडे पांगली.
कानम सरळ निर्वाचन अधिका-याकडे गेली. निवडणुकीचा फॉर्म घेतला, भरला, आणि परत फिरली. सगळ्यांच्या नडरा तिच्या पाठमो-या आकृतीकडे पहात राहिल्या.
ही बातमी वा-यासारखी पसरली. गल्लीबोळातून बाहेर डोकावून लोक तिला पाहू लागले.
ती घरी पोचली तर तिथे आधीच पाच पंचवीस बायका घोळका करून उभ्या होत्या . त्यांनी कानमला मधे घेऊन फेर धरले. सर्वांच्या चेह-यावर एक अप्रत्याशित आनंद आहे!
नाटीचे बोल उमटू लागले.
त्यांच्याबरोबर गाता गाता डोळ्यांच्या कोप-यातून कानमने पाहिले. चुलीजवळ आई फुलके शेकत होती. चुलीच्या उजेडात दिसणारे आईच्या गंभीर चेह-याचे भाव कानमला अगम्य नाहीत. पण कधी नव्हे तो आज मोठे पापा पण अभिभूत होऊन तिथेच बसले आहेत! हातातल्या चिमटयाने लाकडं पुढे मागे सरकवत आहेत!
त्यांना आईजवळ प्रेमानं बसलेलं इतक्या दिवसांत पहिल्यांदाच कानम पहात होती.
नाटीचे बोल घुमू लागले.
मुलींच्या नाच-गाण्याचा जोश चालूच राहिला.
--------------------------------------------------------------------------------------------
















































































































































































































































































































































कोई टिप्पणी नहीं: