शनिवार, 4 मार्च 2017

सागर साद----- अनिता अग्निहोत्री

सागर साद----- अनिता अग्निहोत्री
typed by Ashu -- To proofread

सागरसाद
मूळ बंगाली कथा: अनिता अग्निहोत्री
मराठी अनुवाद: लीना मेहंदळे
"य हॅव कम फ्रॉम मिसेस रंगनाथन!" इंग्रजीत हे वाक्य उच्चरणा-या त्या तरूणानं नमस्करासाठी हात पण जोडले होते. . तरीपण मन्मथबाबू दाराचं एकच कवाड उघडून उभे होते. आता दार उघडून आपल्याला आत यायचं निमंत्रण मिळेल याची तो तरूण नक्कीच वाट बघत होता! नशीब मन्मथबाबूंच्या डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा होता ! त्यांच्या मनात आणि डोळ्यात उफाळलेलं औत्सुक्य आणि आवेगाचं व्दंव्द तो पाहू शकत नव्हता. मन्मथबाबू बावरले पण होते. घरात कुणी ऐकले नाहीत ना त्याचे शब्द ? त्यांनी झर्रकन मागे एक नजर टाकून खात्री करून घेतली.
मुलगा घरात नव्हताच. सुनबाई शुक्रवारची पोथी वाचत देवघरात बसली होती. शैला स्वयंपाकघरात ! मन्मथबाबूंच्या जिवात जिव आला! तरी एकूण संगती लागायला त्यांना पंधरा-वीस सेकंद नक्कीच लागले. असणार! आधी लक्षातच येईना हा तरूण कुणाबद्दल बोलतोय! मग मागचं सगळं आठवलं आणि डोक्यात लख्खन् प्रकाश पडला!
दाराची दोन्ही कवाडं उघडून ते म्हणाले "या , आत या!"


म्हणायला बसायची खोली, पण सकाळी ती अस्ताव्यस्तच असते या घरात! सकाळचे दोन्ही पेपर सोफ्यावर तसेच पसरून पडले होते. समोरच्या टेबलावरच छोटूची बॅट, चेंडू आणि भर म्हणून त्याने जमवलेल्या पोस्टाच्या तिकिटांचा अल्बम पण! वरच्या फ्लॅटमध्ये गेल्या आठवड्यात कुणी नवे भाडेकरू आले आहेत! त्यांच्या मुलीला दाखवण्यासाठी सगळं बाहेर काढून ठेवलं आणि मग तसचं टाकून त्यांच्या फ्लॅटवर खेळायला निघून गेलेला दिसतो. खुर्चीवर रवीन्द्रनाथ ठाकुरांच्या चित्राची मोठी फ्रेम! ती पुसून घेण्यासाठी मन्थबाबूंनीच वरच्या भिंतीवरून काढली होती. तेवढयात हा आला.
सागरसाद
पुसण्याचं फडक दुस-या खुर्चीवरून उचलत त्याला बसायला जागा करून दिली. सोफ्यावरचे पेपर आवरून घेतले! आणि स्वयंपाकघराच्या दाराशी जाऊन हळू आवाजात बोलले...." ते जे कोकम सरबत आणलं होतं असितनं? आहे का ते शिल्लक?"
शैलानं थोडं आश्चर्यानचं विचारलं- "कोकम सरबत? कोणाकडून आलाय?" एरवी मन्मथबाबूंकडे आलेल्या त्यांच्या मित्रमंडळींना चहाच्या अर्ध्या कपावरच कटवलं जातं! पेन्शनीत गेलेल्या माणसानं कशाला जास्त पाहुणचार करावा असं सुनबाईंचं म्हणणं!
"श्शुः हळू बोल! " त्यांनी देवाघराकडे पाहिलं! सूनबाईची नजर पोथीवर नव्हतीच. त्यांच्याकडेत डोळे मोठे करून पहात होती. हिचं कडक व्रत आहे आणि अजून अर्धा तास इथंच बसणार आहे. म्हणून बरं ! "नुपुरकडून आलाय! लवकर दे जरा."
सरबत घेऊन आगन्तुक उठला! दुपारच्या गाडीनं निघायचं होतं त्याला! हातातलं पॅकेट शेजारच्या टीपॉयवर ठेवत म्हणाला, "नुपूर आणि पार्थ मजेत आहेत. .हे तुमच्यासाठी पाठवलं आहे. येतो मी " आणि नमस्कार करून चटकन निघून पण गेला.
"मी शुक्रवारच्या पूजेला बसले की, लगेच इकडे पाहुण्यांच्या गोंधळाला सुरवात होते. टपूनच बसलेले असतात सर्व. पूजा आटोपून आवराआवरी करून बाहेर येताच जयन्तीची धुसफुस सुरू झाली. शैला खाली मान घालून नळाखाली सरबताचे ग्लास विसळीत होती.
"कोण आलं होतं ? तुमच्या कोणी जुन्या ओळखीचं होतं काय?"
जयन्तीचा आवाज थोडा चढू लागला होता.!
सुमारे पंचवीस वर्षापूर्वी असितसाठी मुलगी पहायला गेलो होते. त्याची मन्मथबाबूंना आठवण झाली. जयन्ती तेव्हा निश्चितच सुंदर होती! पश्चिमेकडील खिडकित नतमुख होऊन बसली होती. आणि सुर्याची शेवटची किरणं तिच्यावर पडत होती. नम्रतेची पुतळीच भासली होती. त्यांना! सूनबाई असावी तर अशीच ! त्यांनी लगेच विशेष देवघेव न करता लग्न ठरवून टाकलं होतं. पण आता त्याच जयन्तीकडे ते पाहू शकत नाहीत. ती पटकन् काय टाकून बोलेल त्याचा नेम नाही. ते आणि शैला सुनेच्या राज्यात खाली मान घालूनच वावरतात!
"बोला ना! तुम्हालाच विचारत्येय ना मी ? का या सोफा-खुर्च्यांना? "
"अं, हो हो, तो तो नुपूरकडून आला होता! तिनंच पाठवलं होतं त्याला!"
" :, नुपूर!" क्षणभर जयन्ती अवाक् झाली. मग 'हुं:, असं तिरस्कारानं म्हणत आत निघून गेली. आतल्या खिडकीच्या चौकटीवर येऊन एक कावळा त्याला हाकलण्याचं निमित्त करून आत गेली.
मन्मथबाबूंनी टीपॉयवरचं पॅकेट बघितलं वरून नीट कापड लावून दुमडून शिवलेलं होतं. नुपूरच्याच हातची शिलाई असणार. उघडून पाहिलं तर कळेल. हळूच त्यांनी पाकिट उचललं आणि नाकाला लावून वास घेतला. कुठल्यातरी एका अपरिचित जागेचा गन्ध ! आपरिचित घरातले वास! तेवढयातच पाठीच्या बाजूनं कुणाचे तरी डोळे रोखून पाहत आहेत असं वाटलं त्यांना! आणि तसचं होतं. डायनिंग स्पेसमध्ये उभ्या असलेल्या जयन्तीचा कडक स्वर आला "काय करताय् ? तिकडच्या कशालाच हात लावायची गरज नाही. पडू दे ते पाकिट तिथंच!"
विरस होऊन मन्मथबाबूंनी धीरे धीरे ते पाकिट कपाटावर ठेवून दिलं . असू दे रात्री सगळ्यांची नजर चुकवून बघता येईल.
अंगणात असितची स्कूटर थांबल्याचा आवाज आला. मित्राकडून आला असावा. पंचेचाळीसाव्या वर्षीच किता म्हतारा दिसत होता! केस बरेच पिकले होते. स्टील फ्रेमचा चष्मा चेह-याला विनाकारणच प्रौढ बनवत होता. गल्लीतला त्याचा मित्रपरिवार कमी झाला होता. आईबापांशी बोलणं पण जेवढयास तेवढं . तरी जयन्तीबरोबर फुसफुसत बोलताना त्यांनी आणि शैलान चोरून जे ऐकलं होतं ते असं की, त्याने मित्राबरोबर एक को- ऑपरेटिव्ह सोसायटी जॉईन केली आहे. सॉल्ट लेक एरियात जमीन घेतली आहे. आता जेवढया लौकर घर बांधता येईल तेवढं बांधून ही जागा सोडायची.
नुपूर पळून गेल्यापासूनच जयन्ती आणि असितची धुसफूस सुरू होती. सगळ्यांवरचं त्यांचा राग! या मोहरल्यावर, इथल्या लोकांवर पण! आणि स्वाभाविक आहे ते .वीसेक वर्षे झाली इथे राहून ! मन्मथबाबूंनीच हे घर शोधून काढल होत. मध्यवस्तीत, आजूबाजूला आपल्या सारखीच मध्यवर्गीय घरं! दोन बेडरूम्स , एक ड्रॉइंग रूम, प्रशस्त स्वयंपाकघर, शिवाय वेगळी मोठी डायनिंग स्पेस! दोन्ही खोल्यांना बाल्कनीज त्या काळात दोनशे रूपये भाडं किती वाटलं होतं! पण आता झालंय फक्त साडेचारशे . स्वस्तचं म्हणायचं.पूर्वी जवळच वाचनालय पण होतं आता तिथे व्हिडियो पार्लर आलयं ! तसं मुलगा म्हणतो ते खोटं नाही. मोहल्ला तसाच राहिला असला तरी , लोक बदलले आहेत! पूर्वी ज्या घरांमध्ये त्यांनी स्वतः साहित्यिक गप्पांमध्ये भाग घेतला होता. तिथे आता रात्री उशिरा ब्ल्यु फिल्म आणि ड्रिंक पार्ट्या चालतात. नशेचा अजगर कुणाला कळूं न देता मागल्या बाजूने गिळतोय जणू सर्व मध्यमवर्गीय संस्कारांना! छोटूच्या शाळेसमोरील फेरीवाल्याकडे पण ड्रग्ज मिळतात म्हणे! पण ही खरी कारणं नाहीत, हे घर सोडून जाण्याची! खरं कारण नुपुरचं पळून जाणं हेच आहे ,आणि तेच मन्मथबाबूंना अनाकलनीय आहे, आणि तेच आपल्या पूर्ण धाकात असलेल्या मुलांनी बंड केलं म्हणून एवढा मोडून पडू शकतो?
नुपूर ही मन्मथबाबूंची नात! ती स्वभावाने शांत आणि मितभाषी होती. एक-दोन मैत्रिणी असतील. आपलं कॉलेज बरं की, आपण बरं! आठवड्यातून दोनदा गाण्याच्या क्लासला जायची! ती असं काही करील असं कधी वाटलं पण नाही. असित बरोबर तिचा एक जाईंट अकांउंट होता, कोप-यावरच्या बॅंकेच्या शाखेतच. कधी कधी कॉलेजला सुट्टी असताना पैसे काढायला किंवा ठेवायला जायची. ज्या वर्षी बी.. ची परीक्षा झाली त्याच वर्षी पार्थसारथी त्या शाखेत बदलून आला होता. तामिळ मुलगा, पण दोन पिढया बंगलोरमध्ये राहिलेला. उंचापुरा, काळ्याकडेच झुकणारा! त्याची आणि नुपूरची ओळख कशी झाली, प्रेम कसं जमलं, मन्मथबाबूंना काहीच उलगडा होत नाही. शैला पण काही सांगू शकली नाही. नुपूर तिच्या जवळच झोपायची. भिडस्त स्वभाव, कधी कुठे एकटं जाणयेणं नाही. तिचं कुठलचं वागणं -बोलणं शंका घ्यावी असं नव्हत. नाही म्हणायला सूनबाईचा भाचा मात्र एकदा काहीतरी म्हणाला होता. सुट्टीनंतर पटण्याहून परत आल्यावर ट्रॅव्हलर्स चेक घेऊन याच बॅंकेत गेला होता. नुपूरच घेऊन गेली होती. शनिवारची गर्दी असुनही त्याचं काम पाच मिनिटात आटोपलं.घरी आल्यावर हसत हसत आपल्या मावशीला म्हणाला होता-- "मानलं बुवा आपण! काय जबरदस्त इन्फ्लुएंस आहे नुपूरचा ! ऑफिसरनं आतच बसवून घेतलं आम्हाला. काऊमंटरवर जावचं लागल नाही." त्यांच म्हणण कोणाला खटकलं नव्हत.! म्हणूनच तो ऑफिसर जेव्हा लग्नाची बोलणी करायला घरी आला तेव्हा सगळं घरच हादरलं . रागानं असितच्या कपाळावरील शीर ताडताड उडू लागली. त्याच्या रागापुढे इतर सर्वांचे शब्द घशातच अडकले. हॉलचं दार खस्कन ओढून धरत तो नुपूरला म्हणाला-- " टेल हिम, धिस इज दी वे आऊट! टेल हिम!"
वादळातील झाडासारखी उन्मळून पडली होती नुपूर! पार्थ गेल्यावर धावत जाऊन आजीच्या बिछान्यावर ओक्साबोक्शी रडू लागली. पाठोपाठ जयन्ती क्रुद्ध चेह-यानं आली. ती नुपूरला हिसका देऊन उभी करू लागताच मन्मथबाबू आणि शैला मध्ये पडले होते-- "नाही, मारायचं नाही!"
आकस्मित घडलेल्या या घटनेन सर्वांनाच हतबुद्ध करून सोडलं होतं. सहा महिने घरात सतत रागाराग. नुपूरवर ओरडा, रडारड, स्वयंपाक बंद असं चालू होतं. गल्लीत असितला तोंड दाखवायला जागा उरली नाही! त्याचे परिणाम घरी आईबापांनी न बोलण्यात होऊ लागले. शैलानं स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं. बायकांना जमतं हे! या म्हता-या वयात सांभाळ करणारा मुलगा, त्याच्या कलानं वागलं नाही तर तुटपुंज्या पेन्शनीत आपले आणि नव-याचे हाल होतील हे ओळखण्याइतकी व्यव्हारबुद्धी तिच्याकडेच नक्कीच होती. पण मन्मथबाबूंना राहवतं नव्हतं! नुपूर त्यांची आवडती नात! ती चालायलाही शिकली नव्हती तेव्हा तिचे दोन्ही पाय गळ्यात किंवा कमरेत घालून तिला डोळवत असत मन्मथबाबू! तिच्या बाळदेहाचा दूध, उटी, धुळीचा संमिश्र वास अजून मन्मथबाबूंना आठवतो!
पावसाळ्यात तिला शाळेत पोचवताना गुडघा-गुडघा पाण्यातून तिला उचलून धरून शाळेपर्यंत नेऊन सोडायचे मन्मथबाबू . परीक्षेच्या दिवशी तिने टिफिन व्यवस्थित खावा म्हणून स्वतः तिचा टिफिन आणि पाण्याची बाटली घेऊन शाळेच्या आवारातील झाडाखाली थांबत असत. ते स्वतः बंगालीचे शिक्षक होते. तिला लिहा-वाचायला त्यांनीच शिकवलं . बंगाली साहित्याची कवा़ड उघडून दाखवली. इतर कोणत्याच नातवंडाबरोबर त्यांची जवळीक झाली नाही. शाळेत शिकतानाच नुपूर हळूहळू कविता करू लागली होती. पण मन्मथबाबू सोडून इतर कुणी त्या कविता वाचत नसे! त्यांना वेळ तरी नसायचा किंवा समज तरी नसायची .तिच्या कविता अगदी हळूवार नाजूक असायच्या भारीच तरल संवेदना होत्या तिच्या सगळ्यांशी गोड वागायची! शत्रुता नाहीच. पण मैत्रीही विशेष नाही. वृत्तीनं संकोची मनातलं दुःख बोलून दाखवणार नाही. म्हणून तर मन्मथबाबू व्याकूळ होत होते. पार्थच्या विषयावर कोणा तिच्याशी बोलायला तयार नव्हतं, तिचं मत जाणून घेत नव्हतं. पोरगी त्याच्या प्रेमात पडली असेल तर जीव ओतून बसली असणार ! म्हणून एकदा हिंमत करून तेच असितजवळ गेले होते. हलक्या आवाजात म्हणाले-
"त्या मुलाची थोडी माहिती काढून तरी बघ ना, पोरीची अवस्था पाहवत नाही अगदी!"
"काय संबंध काय त्याचा? आणि तुमचा तरी?" खवळुन उठला होता. असित आणि मन्मथबाबूंचा थरकाप झाला! त्यांना आठवलं, रिटायर झाल्यानंतर ज्या दिवशी चारशे साठ रुपयांची पहिली पेन्शन घेऊन ते आले त्याच रात्री घरात झालेला वादविवाद, मोठया अजितनं त्याच दिवशी धाकटया भावाला आईवडिलांची जबाबदारी समजावून सांगितली होती, स्वतःच्या भोपाळला झालेल्या बदलीची पण वार्ता पण तेव्हाच दिली होती. आणि दोन दिवसात निघून पण गेला होता. ही बदली त्यानेच मागून घेतली होती म्हणे. उद्या असितनं पण हेच केलं तर? महागाईच्या दिवसात या कमी भाडयाच्या घराचा मोह त्याला आहे आणि भाडेकरू म्हणून मन्मथबाबूंच नाव आहे एवढं ठीक! पण त्यानं डोक्यात राग घालण्याइतकं ताणून धरू शकणार का आपण? सूनबाई शेजारीच उभी होती. रागानं फिस्कारली "छान, तरीच मी म्हणते नुपूरला कोण देत हा कानमंत्र?पण बुद्धिभेद करणारे घरातच आहेत. बाहेर शोधायला नको, चिडून असितनं त्यांच्याकडे पाहिलं म्हणाला "बाबा, मला खुप कामं आहेत .तुम्हाला पण असतील .हा विषय काढून पुनः माझा वेळ घेऊ नका. जा तुमच्या खोलीत! "तो विषय पुनः निघाला नाही.
तही होणार होतं ते झालचं ! पार्थ येऊन गेल्यापासून नुपूरचं घराबाहेर पाऊल टाकलेले नव्हतं. असितनं बंदी केली होती आणि ती मुलगी पण मानी होती. तिची मैत्रिण नमिता मधून मधून यायची. एक दिवस सकाळी सकाळी मन्थनबाबू अजून अंथूरणातच असताना शैलाचं ओरडणं कानावर आलं, अहो उठा उठा, सूनबाई कसं करत्येय पाहा!"
बंद दाराजवळ बसून जयन्ती टेबलावर आपलं डोक दाण दाण आपटून घेत होती. शैला तिला बाजूला घ्यायला लागली तर दाणकन तिचा जाड पाटल्या घातलेला हात शैलाच्या छातीवर येऊन आदळला. असितनंच तिचे दोन्ही हात धरून तिला आवरलं-- "कायं करत्येय ? सकाळी सकाळी गल्लीतली सगळी गर्दी इथं गोळा करायची आहे कां?"
"नुपूर निघून गेली, पळाली! एका वस्त्रानिशिच!" सेंटर टेबलवर "'पेपरवेटखाली तिची छोटी चिठ्ठी होती.
आई, बाबा, आजी, आजोबा, तुम्हाला त्रास होईल. पम मी घर सोडून जात आहे. गेले सहा महिने आशेवर बसले होते कीस तुम्ही माझं म्हणणं समजून घेण्याचा विचार कराल. पण तेच झालं नाही. आज मी रजिस्टर्ड लग्म करत आहे. पुढे काय होईल देव जाणे . कधी हाक मारली तर नक्कीच येईन. चोरासारखं पळून जाण्याचं दुःख आहे. तुम्हालाही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही समाजात असं वाटेल. त्याबद्दल क्षमा करा. पण माझ्या बाजुने बघाल तर समाजापुढे तोंड लपवावं असं मी काही केलेलं नाही.
आपली नुपूर, चिठठी वाचून शैला पण नरमली होती-- "क्षमा ,मुळीच नाही. अशा अकृतज्ञ संतानाला अजिबात माफि नाही. लोकांपुढे तोंड दाखवायची सोय ठेवली नाही हिनं."
जयन्ती पण तरातरा उठली. सोफ्याच्या पाठीवर नुपूरचा लहानपणाचा एक फोटो फ्रेम करून ठेवला होता. तो जमिनीवर आपटला. मग कपाटातून हॅंगरवरून तिचे कापड-

सागरसाद
मग कपाटातून हॅगरवरून तिचे कापड-चोपड काढून फेकून देऊ लागली. छोटू आवाक् होऊन आपल्या आईचं नवं रूप बघत होता. विस्कटलेले केस, लाल डोळे, थरथरणा-या नाकपुडया! ही वेडी-बिडी तर होणार नाही ना!
मन्मथबाबू पण हतबुद्ध झाले होते. अर्धवट झोपेनं अंग ठणकत होतं. त्यात हा धक्का. हे बरं नाही केलं नुपूरनं लोक नाव ठेवणार. शंभर गोष्टी बोलणार.
तरी पण असित, सूनबाई किंवा शैलाला जो राग आणि तिटकार वाटत होता तेवढा काही मन्मथबाबूंना वाटत नव्हता! आपला मूल्यबोधच हरपला की काय?
"अहो, असे बघत काय राहिलात? "जा आणि पोरीची खोजखबर घ्या. तिला अडवा! शैलान त्यांना ढोसलं." खरचं की! मुलीला समजावून परत आणायला हवं ! पायातली रबरी चप्पल बदलून घ्यायला निघाले मन्मथबाबू तेवढयातच जयन्तीची गर्जना ऐकू आली. " थांबा गावभर ही गोष्ट करायची काही गरज नाही. बसा आतमधे जाऊन!
असित क्रुध्द चेह-यानं टेलिफोन फिरवत होता. ग्रे स्ट्रीट चौकी, लालबाजार, पोलिसांचे सगळे फोन एंगेज्ड ! त्याचे एक लांबचे सासरे डी. आय. जी. होते त्यांच्या घरी फोन लावला. हो: हो: करून हसला म्हतारा! सज्ञान मुलगी? घरातून पळाली? लग्नासाठी कसा तिला अडवणार राजा.? माझं ऐक ! रिशेप्शनची तयारी कर! म्हणजे पोरगी आणि जावई दोन्ही हाती लागतील. नाहीतर गमावशील दोघांना!" टोलिफोन ठेवून स्तब्ध राहिला असित!
दोन वर्ष होऊन गेली त्या घटनेला ! नुपूर आता इथे राहत नाही. पार्थन मद्रासला बदली मागून घेतली . मधूनमधून पत्र येतात त्यांची. पत्ता दिलेला असतो. आम्ही खुशाल आहोत .तुम्ही सर्व कसे आहात? आई, बाबा, आजी, आजोबा ? आणि छोटूला आशिर्वाद! त्याचा अभ्यास कसा चाललाय? असंच काहीतरी. मन्मथबाबू आणि शैला वाचतात. असित पण वाचतो कधी कधी! जयन्ती मुळीच नाही. या घरातून तिकडे एकही पत्र रवाना होत नाही. नूपुरच्या सर्व खाणाखुणा झाकून ठेवल्यात. तिचे सगळे कपडे एका ट्रंकेत ठेवून दिलेत! तरी बरं त्यामधे डांबराच्या गोळ्या टोकून ठेवल्यात! तिचे सर्व फोटो त्याच ट्रंकेत तळाशी रवाना झालेत. तिची पुस्तकं पण छोटू विकून आलायं.
शैलाच्या गादीवर रात्री झोपणारं आता कुणी नसतं. पण मधेच कधी मनमथबाबूंची झोप उघडली तर त्यांना दिसतं की, झोपेत शैलाचा हात कुणाला तरी शोधत असतो. शुक्लपक्षाचा चंद्र दक्षिणेच्या खिडकितून आपली किरणं पाठवून त्यांची झोपमोड करतो. मग ते हलक्या पावलानं उठून बाहेर बाल्कनीत उभे राहतात! स्तब्धता!
रस्तयापलीकडच्या बकुळ फुलांचा सुगन्ध इथपर्यंत येत असतो. एक काळा-पिवळा छोटेखानी पक्षी चंद्राची किरणं अंगावर घेत समोरच्या टेलिफोन तारेवर बसलेला असतो. जणू काही नुपूरच परत येण्याचा रस्ता शोधतेय! मन्मथबाबूंचा ऊर जणू फुटून निघतो! कोणीच नाही ज्याच्या जवळ हे दुःख मोकळेपणानं बोलावं!
शैला तर आताशा एखाद्या काचेच्या भितींपलीकडे राहते. गप्प तोंडानं, खालच्या मानेनं घरातली कामं उरकत असते. मुला-सुनेचं मन राखून वागते. कितीदा बोलावलं तर कुठे दोनेक मिनिटं तिच्याशी बोलता येतं. मग मन्मथबाबू दुपारी पार्कमधे जाऊन बसतात. गुलमोहराखालच्या चौथ-यावर! बहुधा एकटेच. कधीतरी त्यांचा बालमित्र नवकुमार येतो. तोच म्हणतो, आता बरं नाही बाबा! डोळे शाबूत आहेत तोचं गेललं बरं! हल्ली इतक्या तरूण वयातसुद्धा हार्ट अटॅक येतात. मग माझ्या म्हता-याचं हार्ट कुठून इतकं मजबूत राहिल?
कधी मुडमधे असला की नवकुमार बेसुर आवाजात कुठे तरी ऐकलेल्या ओळी गाऊन दाखवायचा-
" त्याची आई वारली त्रेचाळीससाव्या वर्षी.
त्याचा बाप वारला, बावन्नाव्या वर्षी,
पण त्याला कुणी शिवू नका,शिवू नका!
यम पण त्याला मुळीच शिवत नाही!"
स्वतःला रिझवायला म्हतारी माणसं काय काय कविता करतील!
त्या दिवशी संध्याकाळी सगळे टी. व्ही. समोर मग्न असताना मनमथबाबू हळूच त्यांच्या बाल्कनीत गेले आणि नुपूरकडून आलेल पाकिट उघडल. आत आई- आजीसाठी दोन साडया, वडील आणि छोटूसाठी शर्टांच कापड आणि आजोबांसाठी चंदनाची एक गणेशमूर्ती! सोबत दोन पत्रं! एक नुपूरचं आई वडीलांना लिहलेलं घराचा सविस्तर पत्ता देऊन केललं आर्जव! एकदा येऊन आपल्या मुलीचा संसार तरी बघून जा! दुसरं सुंदर अक्षरात पार्थच पत्र जयन्तीसाठी.नुपूरला दिवस गेलेत. तुम्ही दोघ एकदा येऊन जा. वाटलं तर नुपूरला काही महिन्याकरता माहेरपणाला घेऊन जा.
वाचतां वाचता मनमथबाबूंच्या डोळ्यातून आसू वाहू लागले! एकटी पोरगी! तीही परदेशात. काय दुखतय खुपतयं ते कुणाला सांगणार अशा वेळी? तिला जरं आणता आल असतं तर? मन्मथबाबूंची कल्पना उगीचच भरारी घेते. ते असतात-महाशय मन्मथनाथराय साहेब! कलकत्यात स्वतःचा प्रशस्त दुमजला वाडा. रोज सकाळी सुना येऊन पायाला स्पर्श करून नमस्कार करतात. मुलं मान वर करून बोलत नाहीत बापासमोर! पत्र येताच रायसाहेबांच्या हुकुमावरून दोन माणसं रवाना होतात. नुपूरला जपून घेऊन येण्यासाठी! राहिल तिला हवे तेवढे दिवस! नवागंतुक येऊन पोचल्याखेरीज तिची पाठवणी होणार नाही.
बाल्कनी शेजारच्य खोलीत जयन्तीची चाहूल ऐकून मन्मथबाबू एकदम भानावर येतात. पाकिट कसंबस लपेटून जुन्या रॅकच्या पाठीमागे जातं आणि दोन्ही पत्रं त्यांच्या आतल्या खिशात!
रात्री ते हळूच शैलाच्या बिछान्याजवळ जातात. इतर सगळीकडे निजानीज झालेली.
"जाऊनं एकदा नुपूरला भेटून यावसं वाटतं गं!"
झोपेतून अचानक उठलेली शैला डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहते. "तुमची तब्येत ठीक आहे ना? ती त्यांच्या कपाळावर हात ठेवते. ते नॉर्मलच असतं. "काहीतरी काय खूळ आलय डोक्यात?"
त्यांनी तिला नुपूरचं पत्र दाखवलं ! क्षणभरच तिच्या चेह-यावर ममता ओसंडून गेला--- "आहारे बाई ती माझी!" पण दुस-याच क्षणी तिचा चेहरा विवर्ण झाला! " या वयात कुठून सुचतोय हा वेडेपणा तुम्हाला? सूनबाईन ऐकलं तर घराबाहेर काढील दोघांना! मग एखाद्या झाडाखाली राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही, आणि नातीनं तरी काय केलयं तुमच्या? आईबापांच्या गळ्याला फास लावून गेली. या तिच्या कृत्याला क्षमा नाही!" कूस बदलून भिंतीकडे तोंड करून शैला पडून राहिली.
मनम्थबाबूंनी समोर पाहिलं तर कालपर्यंत हिरवं असलेलं झाड आता निष्पर्ण झालेलं दिसत होतं, की ते दुःस्वप्न होत.?स्वप्नात नुपूर होती. वेदनेनं व्याकूळ झाली होती. 'आई, आजी, ये ना कुणीतरी! शॉक लागल्यात उठून बसले मन्मथबाबू ! घामानं पाठ अशीच वेदनेनं व्याकूळ झालेली सतरावर्षीय शैला आठवली. तीच स्मृती प्रकटली होती.का स्वप्नात? का त्यांनी सर्व आठवणी जपून ठेवल्यात? शैलासारखं जुन्या आठवणी फेकून देणं त्यांना का जमू नये?
ट्रेन वेगानं पळत असतानाच समोर चिल्का लेकची अपार जलराशी चमचम चमकू लागली! त्यामधूनच एखादा डोंगर डोकं वर काढतो. त्या ज्योतिर्मय तलावावरून उडत रात्रीच्या निवा-याकडे जाणारे पक्ष्यांचे थवे! चांदण्या रात्री इथे प-या उरतात आणि आपल्या जादूने माणसांना आत ओढून नेतात अशी किवदंती आहे .तरूणपणी इथं येऊन जायचं खूपदा ठरवलं होत, पण जमलं नाही! ट्रेन वेगातच आहे! अगदी मोजक्या स्टेशनांवरच थांबते! रात्रीची जेवणं आटोपली! आता मन्मथबाबू पण झोपणार!
त्यांच सामान काहीच नव्हतं! एक जाड चादर, एक धोतरजोडी , शर्ट,थोडं सटर-फटर. तीच पिशवी उशाला घेऊन झोपले. एकदा खिसा चाचपून घेतला. तीस-चाळीस रूपये वरकड खर्चाला होते.
कापडी बनियनच्या वरच्या खिशाला चाचपलं. नातजावचायं पत्र तिथे सुरक्षित होत. अपरिचित शहरात पत्ता शोधायचा एवढा एकच आधार होता. घरी सांगून आले होते, जगन्न्थपुरीला जातोय म्हणून ते आणि नवकुमार दोघ मित्र मित्र जाणार आणि चोरेक दिवस राहून परत येणार! त्यांच्या पासबुकात थोडे फार पैसे असायचे. त्यातूनच दीड हजार रूपये काढले होते. नुपूरसाठी एक साडी, पार्थसाठी शर्टपॅन्टपीस अजून त्यांच्या घरात कोण कोण आहेत माहीत नाही-- पोचल्यावर काही तरी घ्यावं लागेल.
त्यांच मन भरून आलं! घरचे लोक किती माणुसकी हरवून बसलेत! आता मध्येच जर मुलाला आणि सुनेला कळलं आपण कुठे गेलो होतो तर! काय संकट वाढून ठेवलं असणार? पण या भीतीपोटी आपण तरी किती दिवस गप्प बसायचं ? रिझव्ह्रेशनसाठी रांगेत उभ्या उभ्या त्यांना एक गोष्ट आठवली होती. त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकमित्राची! ताड- माड उंच काटक्या शरीराचा मास्तर. एकदा शाळेच्या प्रेसिडेंटच्या मुलाला गणितात नापास केलं त्यानं पेपर सोडवलेलाच नव्हता. निरूपाय हेडमास्तरांनी एका नवख्या पोरगेल्या शिक्षकाकडून तो सोडवून घेतला आणि त्यांना देऊन म्हणाले पुनः एकदा पाहून घ्या तारकबाबू! कुठे मार्क द्यायचे बियचे राहून गेले असतील तर. तारक बधला नाही. शेवटी स्कूल कमिटीनं त्यांना स्सपेंड करायचा निर्णय घेतला. आरोप काय तर वर्गात जाऊन झोपणे, मुलांना मारझोड करणे! तीन विद्यार्थी साक्ष द्यायला तयार करून ठेवलेले! ऐकून धावतच मनमथबाबू त्याच्या घरी पोचले होते. ते तुला नक्की सस्पेंड करतील ताकर! तपासून टाक तो पेपर पुनः एकदा!
तारकच्या चेह-यावर एक दिव्य आभा चमकली होती."करू देत सस्पेंड! मला पण पहायचं आहे, या पृथ्वीवर विचार म्हणून काही शिल्लक उरणार आहो की नाही? त्यांच्याही वर दोन प्रेसिडेंट आहेत म्हणावं! वर तो परमेश्वर आणि खाली इथे माझ्या हदयात माझी विवेकबुद्धी!" आज ती विवेकबुद्धी शिल्लक आहे का पृथ्वीवर?
पिवळ्या धमधमीत उन्हाच्या भर दुपारी सापडलं एकदा पार्थसारथीचं घरं! एक मोठी बॅंक ऑफिसर्सची कॉलनी मधे एक छोटेखानी उद्यान! तिथे खेळणारा एक लहान मुलगा घर दाखवायला आला! हे समोरचं अपार्टमेंट. दुस-या मजल्यावरच आठ नंबर फ्लॅटमधे ते राहतात. घर दाखवून खालच्या खाली तो खेळायला पळून सुद्धा गेला. .मन्मथबाबू वर येऊन अर्धवट उघड्या दाराशी थबकले. आतला बराच भाग इथुन दिसत होता. ड्रॉईंग रूम नंतर मोठी डायनिंग स्पेस त्यात नवे चकचकीत टेबल खुर्च्या आत स्वयंपाकघर! पाठमोरी नुपूर शेल्फवरून काही तरी काढत होती. आवेगानं त्यांनी हाक मारली, "नुपूर, ए नुपूर!" ती गरर्कन वळून क्षणभर बघतच राहिली! मग धावत जाऊन त्यांच्या मिठीत शिरली. "दादू, शेवटी तुम्ही आलात माझ्या हाकेला धावून!"
मन्मथबाबूंचे शब्द घशातच अडकत होते. आतून ह्दय उचंबळून येत होतं. जणू समुद्रात आतल्या आत मोठी आंदोलनं व्हावीत पण वरची अथांग शांतता तशीच अबंग रहावी!
जरा स्वस्थता आल्यावर हातपाय धुऊन चहा पीत मन्मथबाबू विसावले. नुपूर रोडावली आहे! गालाची हाडं पूर्वी इतकी वर आलेली नसत. चेह-यावर एक वेगळीच झळाळी आहे! मातृत्वाची लक्षणं दिसू लागली आहेत शरीरावर!
मद्रासी पद्धतीनं धोतर लपेचलेले एक वृ्द्ध गृहस्थ आले. हे नुपूरचे सासरे! तिच्या सासूबाई बंगरोरला मुलीकडेच असतात! त्यांच्या तोडक्यामोडक्या हिंदी व इंग्रजी भाषेत संवाद नीट जमत नव्हता. जरा वेळानं ते उठले--- जेवण्यापूर्वीच्या नैवेद्यासाठी नुपूरला हळू आवाजात काही तरी सूचना दिली तिनं हसून मान डोलावली.
मन्मथबाबूंकडे पाहून बोलली, "म्हणताहेत तुमच्या पद्धतीन त्यांना मासळीकरं इथलं जेवणं कसं काय आवडेल त्यांना!"
"नको नको, हे सर्व सोपस्कर करत बसू नको, परवाच मी जाणार मधे एकच दिवस तर मिळेल आपल्याला.
तेवढयातच पार्थसारथीची गाडी त्याला लंच साठी सोडायला आली. मन्मथबाबूंना अचानक पाहून आनंद आणि कृतज्ञतेनं त्याचा चेहरा फुलून उठला. वाकून नमस्कार करून त्यानं त्यांचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले. शेजारच्या देवघरातून मंत्रोच्चार अजून चालूच होते. एका अज्ञात भाषेत!
मगापासून स्वैंपाकघरातून नुपूरच्या फोडण्यांचे अपरिचित वास येताहेत! कौतुक आणि उत्सुकतेनं त्यांनी सगळं पाहून घेतलं होतं. सामान, भांडी-कुंडी जास्त नव्हती त्यांच्या नव्या संसारात! पण घर कसं नीटनेटकं ठेवलं होतं. सगळी स्टीलची चकाकणारी भांडी! बेडरूममध्ये भारी रंगीत चादरी!स्वतः नुपूरची सुतीच पण जरकिनारी साडी! चंदनाचा आणि साजुक तुपाच्या निरांजनाचा वास संपूर्ण देवघरात. वेगळी प्रशस्त गेस्टरूम!
पण मन्मथबाबू जाणार आणि एकटेच हे ऐकून पार्थचा चेहरा उतरला. नुपूरच्या चेह-यावर कोणताच अवसाद नव्हता. पण त्याला वाटलं असावं की, नुपूरच्या पाठवणीसाठीच ते आलेत. घरातल्या वातावरणाबद्दल ते फारसं बोलले नव्हते.
रात्री जेवण आटोपून थोडा वेळ गच्चीत बसले मन्मथबाबू! पार्थन स्वतःच त्यांची गादी घालून दिली!
" दोन दिवसांच्या प्रवासात दमला असाल-- झोपा आता दादू!"
सकाळी पक्ष्यांच्या किलबिलीनं मन्मथबाबूंना जाग आली. ते गच्चीत आले. नुपूरचे सासरे कधीच उठून आंघोळ आटोपून फुलं आणायला खाली बागेत गेले होते. त्यांनी मान वर करून पाहिल आणि हसून म्हणाले-- "वणक्कम्!" एक काळीसावळी स्थुल हसतमुख बाई इडलीच्या रगडयात काह

सागरसाद
एक काळीसावळी स्थुल हसतमुख बाई इडलीच्या रगडयात काही-बाही वाटून काढत होती. त्याचा घण् घण् एकसुरी आवाज चालूच होता. आत डोकावून पाहिलं तर नुपूरचा इडली, सांबार, चटणीचा पहिला हप्ता तयारच होता. तेवढयात कामवाला छोटा मुलगा पळत काही तरी घेऊन आला. त्यांनी पाहिलं- त्यांच्याकरता वेगळी तयारी होती-- टोस्ट, बटर, जाम शिवाय गुलाबजामुन! बरोबर,दक्षिणेत रसगुल्यापेक्षा गुलाबजामुनचीच जास्त चलती आहे! "तुम्हाला इथलं तिखट इडली, सांबार कदाचित खावणार नाही दादू!" 
सागरसाद
"कशाला एवढा त्रास घेतेस माझ्याकरता? असं जरी बोलले तरी मनातून त्यांना एकीकडे आनंद दाटून येत होता. तर दुसरीकडे वाटत होतं-बाप रे ! किती या मद्रासी स्वयंपाकाचा व्याप! कसं नुपूर सगळं शिकली असेल? आणि चव तरी काय बाबा? आंबट आणि तिखट! हे खाऊनही त्या सास-याचा चेहरा असा गोल गरगरीत आणि स्वभाव इतका मऊ कसा काय कुणास ठाऊक?"
अचानकं त्यांना आठवलं-- "अंग नुपूर तुमच्या गावाला समुद्र आहे ना?"
" आहे ना, जवळच आहे इथुन, जायचं का आपण?" पार्थच्या डोळ्यात कौतुक दाटून आलं! पंधराएक मिनिटातच एका सावलीच्या रस्त्यानं चालत-चालत ती तिघं समुद्र किना-यावर पोचली. निळा गंभीर समुद्र, लाटांची जास्त गडबड नाही. चालून घामेजल्या चेह-याला समुद्री हवेचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. तिघं घोटाभर पाण्याक जाऊन उभे राहिले. लाटा हळूच याचच्या आणि पायांना गुदगुल्या करत मागे सरकायच्या.त्याबरोबर छोटे छोटे शिंपले येत होते.नुपूर लहानग्या मुलीप्रमाणे ते वेचून मन्मथबाबूंच्या हातात, खिशात कोंबत होती.
जरा वेळानं शिपल्यांच्या गर्दीत त्यांना एकमोठा शंख सापडला. पार्थ त्या दोघांपासून थोडा मागे पडला होता. बहुधा मुद्दामच रेंगाळला होता. !
शंख मस्तच होता. हातभर मोठ्या आकाराचा आणि हळूवार क्रीम कलरचा! समोर त्याच्या पिवळ्या रंगाच्या तोंडावर चक्राकार वलयं तयार झाली होती! तो आधी स्वतःच्या कानाला लावून पाहिला नुपूरने. मग मन्मथबाबूंच्या कानावर टेकवून म्हणाली, "दादू पहा, पहा, समुद्राचा शब्द ऐकू येतो यातून!"
खरंच की! शंखाच्या आतला अंधःकार म्हणजे जणू दुसरा समुद्रच! आणि तो गर्जत होता. बिन लाटांचाच! जणू समुद्राच ह्दयच तो आपल्या मर्मबंधात साठवून घेऊन बाहेर आला होता.
तीराच्या दलदलीत काही टिटव्या आणि त्यातून छोटे छोटे पक्षी तुरूतुरू चालतं अन्न शोधत होते.. लाट ओसरली की, तिच्या मागे धावत! मग त्यांना पण गोगलगायी, खेकडे आणि अजून क्षुद्र किडे सापडत होते.
"नुपूर, तुला आताच कलकत्याला जायची इच्छा आहे का?" अचानक विचारलेल्या त्या प्रश्नानं नुपूरची सर्व स्थितप्रज्ञता मोडली. " आईनं तुम्हाला काही निरोप दिलाय का?"
तसा काही मुद्दाम निरोप नाही दिलेला!" आपण घरी कोणाला न सांगताच आलो हे लपवणं जड होतं बहुतेक. "पण काही तरी मॅनेज करता येईल आयत्या वेळेला. चल, चलत असलास तर !" एकीकडे हे बोलत असतानाच जयंतीच्या कल्पनेनंदेखील त्यांना घाबरंघूबरं झालं होतं.
"नको राहू दे, काय करायचं जाऊन!" म्लान हसून नुपूर म्हणाली तिच्या टपो-या डोळ्यांत अचानक दोन मोतीचआकार घेऊ लागले आणि पाहता पाहता ओघळले..मन्मथबाबूंचा जीव भरून आला. पण तिची आसवं न पाहिल्यासारखं करत त्यांनी विषय बदलला," तुझ्यासाठी एक जमाडी जम्मत आणली आहे, घरी गेल्यावर आठवण कर हं तुला दाखवायची!"
"काय गंमत?"
"तुझी कवितांची वही!"
"खरचं? " नुपूर क्षणात हसरी झाली- "कुठे सापडली तुम्हाला?"
हिला काय सांगायचं? ज्या दिवशी ही घर सोडून गेली त्या दिवशी जयन्तीनं रागानं हिची कवितांची वही खिडकितून खाली फेकून दिली होती. दिवसभर मन्मथबाबूंची हिम्मत झाली नव्हती. पण दुस-या दिवशी पहाटे दुध आणायला जाताना दिसली होती. वर शिरीषाच्या फुलांचा सडा पडला होता.

सागरसाद
गाडीनं वेग घेतला तसा मन्मथबाबूंच्या डोळ्यासमोर नुपूर आणि पार्थच्या युगलमूर्ती छोटया छोटया होत गेल्या! त्यांचे डोळे दुथडी भरून वाहत होते. आता पुनः कधी भेट होणार पोरीची? चालत्या ट्रेनच्या गजांना धरून दोघांनी बजावून सांगितलं होतं, "पोहचल्यावर पत्र लिहा दादू, विसरू नका!"
" लिहतो, लिहतो, पण तुम्ही पण लिहित रहा. व्याह्यांचा फोटो पाठव मला!"
ट्रेन चांगली दोन तास लेट होत होत दुपारी दीडला कलकत्याला पोचली!
भुकोची वेळ आणि मरणाचा उकाडा! या वेळी कोणतीही नोटिस न देताच घरी पोचलं तर जेवण मिळण्याची बातच नको,! स्टोशनच्या कॅँटीनमधे एका कोप-यात तोंड लपवून त्यांनी जेवण आटोपून घेतलं. डोळ्याच्या कोप-यातून इकडेतिकडे पाहत-मुलगा, सून यांच्या ओळखीचं कोणी टपकलेलं नाही ना!
'मेलो! आज सेकंड सॅटरडे! असितला सुट्टी. सुनेला तोंड कसं द्यायच ते मनाशी ठरवत असतानाच त्यांना आठवलं. पम घरी तर जायलाच हवं! कामवाल्या मुलीनं दार उघडलं! 'वाचलो, थोडा वेळ तरी," असं म्हणत सामान एका कोप-यात ठेवून ते बाथरूममधे शिरले. कमी पाण्यात, कमीतकमी आवाज करत हातपाय तोंड धुवून आले!
"बाबा, आत्ताच आले वाटतं? कशी झाली ट्रिप?"
जयन्तीच दारात येऊन विचारत होती. तोंडावर उदासवाणा भाव, पण राग नव्हता! हातात पाण्याचं तांब्याभांड होतं!
"चांगलीच झाली म्हणायची जगन्नाथचं दर्शन मिळालं आणि भरून पावलो, पण काय उकाडा, आणि हां-- " असे म्हणत त्यांनी खिशातून शिंपले काढून सेंटर टेबलावरच ठेवायला सुरवात केली. त्यात केवढी तरी वाळू पण होती.
"मग घरासाठी काही प्रसाद नाही आणलात?"
"हिश्श--------------,
एवढयातेवढया गोष्टी कशा आपल्या लक्षात नाही राहिल्या? पण उघडपणे ते म्हणाले,! "नाही गं! इतकं गरम होत होतं . तो शिरा-पुरीचा प्रसाद टिकणार का? तिथंच खाऊन संपवलेला बरा!"
"!" जयन्ती म्हणाली, भात खाणार का? तर कुकर ठेवते लगेच!"
"नको, आत्ताच नवकुमारकडे जेवूनच आलो, . सोडलचं नाही त्याच्या सुनेनं!मात्र एखादा ग्लास चहा मिळाला तर-------"
चहाचा एक घोट घेतल्यानंतर ते भानावर आले. त्यांना चहा देऊन जयन्ती आत गेली नव्हती. उलट आतातर खुर्ची ओढून त्यांच्यासमोर बसली होती., नुपूर कशी काय आहे?"
" आँ, काय बोलतेस?"
मन्मथबाबूंचा चहाचा ग्लास चांगलाच हिंदकळला. नशीब सांडला नाही गरम चहा अंगावर!
"मी म्हणते, नुपूरला भेटून आलात ना! मग कशी आहे माझी बाई?" तिच्या आवाजातलं कारुण्य लपत नव्हतं! त्यांनी स्वैपाकघराच्या दिशेनं पाहिल. दारात शैला उभी होती. तिच्याही नजरेत तीच व्याकूळता! दोन वर्षांच दुःख सास्वासुनेच्या मनाचे बांध फोडून आज पहिल्यांदाच बाहेर पडत होतं जणू! गळा खाकरून सावरून बसत ते म्हणाले, "हां, ठीकच चाललयं पोरीचं! तिचा नवरा अन् सासरा! दुस-या मजल्यावर हवेशीर फ्लॅट-समुद्राच्या अगदी जवळ आहे बरं का!"
बोलता-बोलता त्यांना जाणवल बोडरूममधून असित पण येऊन दारात उभा राहिला होता. तिकडे न बघितल्यासारखं करतचं त्यांनी गेल्या तीन दिवसातल्या सगळ्या घटना घोळवून घोळवून सांगितल्या आणि उठून उभे राहत म्हणाले, "चला ,दमलोय् खूप, जरा पडतो आता!"
शैला त्यांच्या मागे मागे त्यांच्या बेडरूममध्ये आली. "धड खोटं पण बोलता येत नाही तुम्हाला! मारे नवकुमार बरोबर पूरीला चाललोय अशी चिठ्ठी ठेवलीत! तो नवकुमार इकडे गावभर हिंडतोय!"
पंजाबी कुडता गळ्यात घालता घालता अडकले त्यांचे हात--- मोठया मुश्किलिने सोडवले!
रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या त्यांनी हातात तो शंख धरून ठेवला! त्याच्या आत हलक्या हिरवट रंगाचा अंधार पसरलेला होता. त्यांनी शंख कानावर दाबून धरला--तोच धीर गंभीर समुद्राचा आवाज! कुठून येतो हा आवाज? त्यांच्या ह्दयातल्या हाकेचा तर प्रतिध्वनी नाही ना?
बाहेर फिरक्या चंद्रप्रकाशात पाहिलं तर त्यांचा आवडता काळा-पिवळा पक्षी बाल्कनीत कपडयांच्या तारेवर बसून आराम करत होता!

लीना मेहंदळे
५०, लोकमान्य कॉलनी, पौड रोड,
पुणे-४११ ०३८.


















































































































































































































































































कोई टिप्पणी नहीं: