गुरुवार, 16 फ़रवरी 2017

ती एक राणी -- अंतर्नाद

     ती एक राणी

इन्दु पत्ते पिसत होती. एखाद्या सराईत खेळाडूप्रमाणे ! तिच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा जुगांर खेळण्यासाठी ! पण इतरांनी तिच्या आयुष्याचा जुगारच नव्हता का खेळला ?
     इन्दु आणी सुरेशच्या नकळत बाजूच्या खोलीतून त्यांच संभाषण ऐकत उभ्या असलेल्या माईसाहेबांच्या डोळ्यांत आज पहिल्या प्रथम इंन्दुसाठी पाणी होते आणि या जुगारात आपला मुलगा हरावा अन् सून जिंकावी या साठी त्यांच मन व्याकुळल होत.
     माईसाहेबांच माहेर श्रीमंताच. त्यांच्या वडिलांचा मोठा व्यापार होता. त्यांचे जबर्दस्त प्रतिस्पर्धी शहरात जम बसवू पहात होते, तेंव्हा प्रतिस्पर्ध्याच्या तरूण व होतकरू मुनीमालाच आबांनी वश करून घेतले होते. अण्णासाहेबांच आणी माईंच लग्न झाल. लाडक्या लेकीला आबांनी भरभरून हुंडा दिला. शिवाय जावयाला व्यापार सुरू करण्यासाठी भांडवल त्यांचा स्वतःचा व्यापार धान्याचा होता पण जावयाने बिल्डिंग मटीरीयलचा व्यापार सुरू केला. पहाता पहाता अण्णासाहेबांनी आपल्या धंद्याची अफाट वाढ केली.
     या सुखी संसारात भर घातली ती सुरेशच्या आगमनाने. मुलाच्या जन्मामुळे सासरी व माहेरी माईसाहेबांचा दबदबा वाढला होता. सुरेश अतिशय थाटामाटात आणि लाडांत वाढू लागला. अण्णासाहेबांचे आईवडील सुखवस्तू होते. दारिद्य्राची म्हणून म्हणतात ती झळ त्यांना बसली नव्हती तरीही लग्नानंतर पाहिलेली सासरची श्रीमंती आणि आता स्वतःच्या कर्तबगारीने तशीच श्रीमंती मिळवलेल्याल अण्णासाहेबांची सक्त ताकीद होतीः की सुरेशला मागेल ती प्रतेक वस्तू मिळालीच पाहीजे. "तो माझा मुलगा आहे-- नकार ऐकून घेण्यासाठी जन्माला आलेला नाही" असे ते गर्वाने सांगत.
     शाळेपर्यंत सुरेश हा एक चैनीत वाढलेला अभ्यासात फारस मन न रमणारा मुलगा होता. तरूण वयांत आल्यावर त्याच्या भोवती हर तऱ्हेचे बदसल्लागार जमले. शरीरप्रकृती दणकर इतरांविषयी कमालीची तुच्छता पैसा फेकून वाटेल ते मिळवू शकण्याचा अहंकार ! सुरेश हळू हळू जुगाराकडे ओढला गेला. अण्णासाहेब आणि माईसाहेबांच्या हे लक्षांत आल तेव्हा फार उशीर झाला होता. त्यातच एकाएकी अण्णासाहेब स्वतःच सुरेशच्या जाळ्यांत ओढले गेले.
     खरं तर सुरेशने जाळं लावलेल नव्हतच. आपल्या सहली, दारू आणि जुगाराचा नाद पुरवण्यासाठी पैसे माईंकडून मिळतात पण मुळतः ते अण्णासाहेबांच्या व्यापारातले असतात एवढे भान ठेवून सुरेश त्या दोघांशी अदबीने वागत असे. हे ही कारण असेल की त्याच्या इतर दुर्गुणांबात कोणी कांही बोलले तर अण्णासाहेब ते पूर्ण खर मानीत नसंत. एकदा एकाएकी सिमेंटचे भाव कोसळून त्यांना व्यापारात मोठी खोट आली. खेळत्या भांडवलाची चणचण भासून व्यापाराचा सर्व डोलाराच गडगडणार की कांय संपूर्णपणे बुडणार नव्हते. इरदार, इस्टेटी विकून टाकून, देणी फेडून त्यांच्याकडे एखाद्या छोट्या घरांत त्यांच्या बालपणी रहात होते तेवढ्या सुस्थितीने जगण्याइतपत शिल्लक. निश्चित रहात होती. अशावेळी अवचितच सुरेशने त्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला होता. रहातं घर विकण्याऐवजी ते जुगारात लावायची एक संधी त्याला हवी होती त्यातून अण्णासाहेबांचे देणे फिटणार होते, हरला असता तर मात्र त्यांची सर्व संपत्ती बुडून त्यांना हलाखीची वेळ येणार होती. त्या पेचाच्या प्रसंगी अण्णासाहेबांना पैशाता मोह सुटला नाही. आयुष्यांत नेहमी सचोरीचाच व्यापार करणाऱ्या त्या कर्तृत्ववान माणसाने मुलाचा प्रस्ताव कबूल केला. सुरेशचे दैव बलावत्तर होते. तो जुगार जिंकला आणि अण्णासाहेबांचे घरदार, सर्व शाबूत राहू धंद्याची घडी पुनः बसली. मात्र त्या धंद्याला अण्णासाहेबाच्या सद्वर्तनाची जी बैठक लाभली होती ती संपलीआता सुरेश मुनीना उघडपणे धंद्यातील हिशोब विच्यारू लागला होता आणि त्याला हवे असतील त्या प्रमाणे पैसे उचलत होता.
       माईसाहेब व अण्णासाहेबांच्या दृष्टीने सुरेश ताळ्यावर यावा याचा एकच उपच्यार आता शिल्लक उरला होता त्याचे लग्न करून देणे. अण्णासाहेबांनी मुद्यामहून आपल्या तोलामोलाचे स्थळ न पाहता गरीबाघरची हा लेक आपली सून करून घेतली होती. सुरेशने देखील फारसे आढेवेढे घेतले नव्हते. मात्र इंदूला त्याने पहिल्या रात्रीच सांगून टाकले होते की त्याच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणी होत्या त्यांचा अपमान होईल असे इंदुने वागता कामा नये. सुरेश बरोबर त्यांच्या सहली, ड्रिंक पार्ट्या, जुगाराचे अड्डे इत्यादी चालत रहाणार ! जगण्याची मौज त्यातच आहे. काही मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. सुरेशलादेखील त्यांचा सहवास प्रिय आहे. त्यामुळे त्याच्या कांही रात्री त्यांच्याबरोबर जाणार ! इंदूने या सर्वांबाबत तक्रारीचा एक शब्दही काढीयचा नाही !
       मात्र एक गोष्ट त्याने पहिल्या रात्रीच कबूल केली होती. त्यच्या आतापर्यंतच्या सर्व मैत्रिणी पेक्षा इंदु निश्चितच सुंदर होती. तिची जर ड्रिंक्स घेण्याला व पत्यांच्या खेळांत पार्टनरशिप करायला हरकत नसेल तर अशा कित्येक पार्ट्यांमधे "यू बुईल रूल दी शो !" संकोची पण बुद्धिमान इंदुने खालमानेनेच प्रतिप्रश्न टाकला होता "मी हे सर्व केले तर इतर मैत्रिणीबरोबरच्या रंगीत रात्री थांबतील कां ? सुरेशला राग आला होता. त्याला उलट प्रश्न ऐकण्याची  सवय नव्हती. त्याचे नाही हे उत्तर ऐकल्यावर उरलेली रात्र इंदुला असस्थ झाले होते. या माणसाबरोबर आपले भवितव्य कांय याचा थोडक्यात अंदाज तिला येऊन चुकला.
       दुसऱ्या दिवशी सकाळीच नोकराने वर्दी दिली की माईसाहेबांनी तिला बोलावले आहे. भीतभीतच ती त्यांच्यासमोर आली आणि वाकून नमस्कार केला. माईची नजर तिला खालून वरपर्यंत तपासत होती.त्यांच्या नजरेत जबर होती, ती आणि आवाजात हुकुमत. इंदुला त्यांनी त्यांच्या रात्रभरातील सर्व बोलणी सांगायला लावली. हा अपमान काल सुरेशने केलेल्या अपमानापेक्षाही जास्त होता. तिच्या प्रश्नाबद्दल व सुरेशच्या उत्तरावरील तिच्या प्रतिक्रियेबद्दल माईसाहेबांनी तीव्र नापंसंती दाखवीली. स्वतःच्या सौदर्याचा उपयोग करून तू सुरेशला दिवसरात्र अ
डकवून ठेवल पाहिजेस अशी अपेक्षआही बोलून दाखवली.
       तिथून पुढे हा परिपाठच झाला. माईसाहेब रोज सकाळी तिला बोलवून घेत व रात्रभरातील गोष्टी सांगायला लावीत. सुरेश आता उशीरा घरी येऊ लागला. येताना तो पिऊन तरी असायचा. इंदुच्या पावित्र्याची तो खिल्ली उडवायचा. पण इंदुचा स्वाभिमान याबाबतीत तिला साथ देत होता. तिच्या इच्छेअनिच्छेचा विचार न करता तिने ड्रिंक्स घ्यावी असा आग्रह सुरेशने कां करावा ? बरं वेळ त्या मोबदल्यांत त्याने त्याच्या मैत्रिणी सोडण्याचे कबूल केले असते तर त्याच्या ऑफरला कांही मार्क देता आले असते. पण त्याच्या मैत्रिणी तो सोडणार नाही, पार्ट्या आणि पत्यांचे अड्डे पण सोडणार नाही, आपण मात्र फक्त त्याची सोबत करायला व त्याची बाहुली म्हणून मिरवायला जायच ? त्या मिरवण्यांत कांही स्वाभिमान नाही ! खरं तर त्याच्या इतर मैत्रिणींसारखीच ती पण थोडी जास्त सुंदर, कदाचित जास्त स्मार्ट पण होऊ शकेल. पण फक्त तिची बाह्य सुंदरता आणी ती देखील सुरेशची संपत्ति म्हणून त्याला मिरवण्यापुरतीच एवढीच तिची लायकी होती कां ?
        खरं तर तिची लायकी होती कांय होती ? गरीबाघरच्या सहा भावंडापैकी एक ! हुषार होती म्हणून शिकू शकली शिक्षकमंडळी वर्गणी करून तिची फी भरत म्हणूनत ! त्या चांगुलपणानेही तिची कुतरओढ होई. माईसाहेबांनी मागणी घातली तेंव्हा इतर भावंडाचे पुढचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊनच तिने स्वतःचे बलिदान स्विकारले होते. पण त्या स्वीकारातही थोडीशी आशा कुठेतरी होती. सुरेशला आपलासा करून घेण्याची ! त्याच्या पौरूषाला आव्हान देण्याची ! लग्नानंतर त्याच्या स्वभआव कळूनही तिला वाटे की आपल्या प्रेमापुढे तो सर्व दुर्गुण सोडेल आपण त्याला सोडायला लावू. पण तिच्या वाट्याला येणाऱ्या सर्वच रात्रींना तो त्याच्या मैत्रिणींचे किस्से सांगू लागला तशी तिची आशा मावळत गेली. चिडून तिने एकदा त्याला विच्यारले होते -- त्यांच्यापैकीच कुणाशी लग्न का नाही केले `?" "छे , मला हवी तशी त्यांच्यापैकी कोणीच नाही."
      "पण अशी कुणी असेलच तुमच्या दृष्टीने लायक, तर तिच्या दृष्टीने तुम्हीं लायक असाल कां ?" या प्रश्नावर मात्र सुरेशने तिच्यावर सरळ हातच टाकला- "माझी लायकी काढतेस ?" त्यानंतर ती दोघं एकमेकांना टाळू लागली होती. इंदुचे कितीतरी प्रश्न तिच्या मनांत राहून गेले. सुरेशला हवी तशी जर त्याची कोणी मैत्रीण नव्हती तर त्यांच्या बरोबर तो रात्र-रात्र कां घालवत होता ? इंदु तरी कुठे होती त्याला हवी तशी ? मग तिच्याशी तरी लग्न कां केल ? तिने त्याच्या पार्ट्यांमधे साथ दिली असली तरी तो आपल्या मैत्रीणींना सोडणार नव्हता म्हणजे पार्ट्यांना साथ देणारी बायको नको होती. मग त्यला नेमकी कशी बायको हवी होती ?
      या लग्नामुळे इंदु माहेराला पण पारखी झाली होती. लग्नाआधीच माईसाहेबांनी नानांना तिच्या वडिलांना बोलवून घेऊन स्पष्ट सांगितल होत - तुमच्या मुलीच्या रूपागुणाकडे पाहूनच तिला सून करून घेतोय. लग्नाचा सारा खर्च आमचा शिवाय तुमच्या घरासाठीही पैशाची व्यवस्थित सोय करू ! तुमच्या इतर सर्व मुलांच जन्माच कल्याण होईल. मात्र एक अट लग्नानंतर माहेरची माणसं इंदुला भेटायला येता कामा नयेत. आमच्या घराला ते शोभणार नाही !" आपल्या गरीबी कडे  पाहून काळजावर दगड ठेवत नानांनी हा व्यवहार मान्य केला होता. लग्नाआधी त्यांनीच भरल्या डोळ्यांनी हे सर्व तिला ऐकवल होत.
       आधीच्या काळांत माईसाहेबांकडून इंदुसाठी भारी साड्या, दागीने येत असत ! रात्री तो साज चढवून तिने युरेशला रिझवावे अशी त्यांची सूचना असे. पण त्याचा उपयोग होत नाहीसे पाहून त्यांनी इंदुला वेगळा सल्ला दिला तिने त्याच्या मनांत करूणा निर्माण करावी ! तिने आजारपणाचं, त्रासाचं, कष्टांच नाटक कराव आणी सुरेशची सहानुभूती मिळवावी. याला मात्र इंदुने सपशेल नकार दिला. तिने सुरेशच्या करूणेची भीक कां म्हणून मागावी ? खरं तर माईसाहेबांचच चुकल होतं. त्यांचा मुलगा कसा आहे त्यांना माहीत होत. मग तिचा बळी कां घेतला ? पण सालस मनाच्या इंदुला अस कधीच वाटल नाही की हा प्रश्न विचारून माईसाहेबांना दुखवाव !
        इंदु बधत नाही हे पाहून आता माईसाहेबांनी स्वतःच तिला त्रास द्यायला सुरूवात केली. तिच्याकडून घरांतली कामे करून घेणे, तिला जुने पाने नेसायला देणे, तिला खायला पुरेसे न देणे इत्यादी सर्व प्रयत्न त्यांनी केले. तिने दुःखी कष्टी व्हावे मग करूणेच्या भरांत का होईना सुरेशने तिच्याबद्दल प्रेम व आपुलकी दाखवावी असा त्यांचा हेतू होता. पण इंदुनेही जणू चंग बांधला होता - सुरेशसमोर कष्टी न दिसण्याचा ! त्यामुळे माईसाहेबांचा राग आणि जळफळआर वाढू लागला. इंदुला त्या मनापासून त्रास देऊ लागल्या. तिचा दुखास करू लागल्या !
       इंदु बघायची की अधून मधून सुरेश नीट वागायचा. घरी येतांना नीट शुद्धिवर असायचा घरांत आईवडिलांबरोबर व नोकरा चाकरांबरोबर नीट वागायचा. तिला राळायचा पण दुखास दाखवत नसे. असे पाच सात दिवस जायचे. मग पुनः त्याचे दोन तीन दिवस घरी न येणे, पिऊन येणे असे सुरू व्हायचे ते चांगले दोन तीन महिने ! हळू हळू तिला कळून चुकले की त्याला मोठ्या रकमेची गरज असेल, जी रक्कम माईसाहेब किंवा मॅनेजर स्वतःच्या अखत्यरीत देऊ शकत नाहीत, अण्णासाहेबांच्या कानावर घालावे लागते, अशा वेळी सुरेश आपले वर्तन बदलत असे. त्याच्या अशा वागण्यानंतर मग माईसाहेबांच्या रदबदलीने अण्णासाहेब त्याला पैसे द्यायला तयार होत असत.
         अशा .... तिच्याकडे लक्षपुर्वक दिवशी सुरेशही बघत होता. इंदुला होणारा छळ, माईसाहेबांचे टोमणे ! इतक असूनही त्यांच्या घरी येणआऱ्या नातेवाईक किंवा पाहुण्यांसमोर तिने घराचं व्यंग उघड केल नव्हत. आताश अण्णासाहेबांना ब्लड प्रेशरचा त्रास वाढू लागला होता अशावेळी त्यांच्या औषधपाण्याची काळजी ती घेत होती. सुरेशच्या वागण्यामुळे त्यांनी बसवलेली व्यपाराची घडी मोडत आली होती. त्यांची घसरगुंडी सुरूच होतीत्यांची घसरगुंडी सुरूच होती. मागचं संकट एकदाच कोंसळल होत - सिमेंटच्या रूपात. थोड्याशा पूर्व कल्पनेने अशी कित्येक संकटं त्यांनी वेळेतच सावरली होती. पण सुरेशच्या मागण्या म्हणजे त्यांच्या व्यापाराला व त्यांच्या उमेदीलाही लागलेली गळती होती. एकीकडे धनाचा क्षय होत होता तर दुसरीकडे सुरेशच्या वागण्यावर उपाय सुचत नव्हता.
         असेच एकदा मॅनेजर घरी आले. महत्वाच्या मुद्यावर अण्णासाहेबांशी चर्चा करायची गरज होती. पण नुकतीच त्यांना झोप लागली असून त्यांना उठवू नये अस इंदुच मत होत. मॅनेजरने निरोप ठेवला. मुद्दा अण्णासाहेबांना नीट कळवायचा म्हणजे इंदुलाही तो नीट समजवून द्यायला हवा संध्याकाळी ते निर्णय विचारायला परत आले तो अण्णासाहेबांची प्रकृति खालावलेली होती. मात्र इंदुने त्या परिस्थितीबाबत आपल मत बनवल होत व तेच मॅनेजरला सांगितल. तिचा निर्णय योग्यच होता व मॅनेजरचेही तेच मत होते. हा अण्णासाहेबांचा जुना व विश्वासू मॅनेजर अत्यंत प्रामाणिक ! या वृद्धांच्या डोळ्यातून कांही सुटले नव्हते. अण्णासाहेबांची खंगत चाललेली प्रकृती त्यांची जबाबदारी पेलायला लायक नसलेला त्यांचा मुलगा, घरातल्या सुनेची - आबाळ आणी अपमान ! पण आज इंदुच हे नवीन रूप त्याला भावल होत ! तिला व्यापाराची उपजत जान असावी ! देव एका बाजूने कमी देतो तर दुसरीकडे ती उणीव पूर्ण करत असतो. हळूहळू मॅनेजर अडल्यापडल्या वेळी इंदुचाच सल्ला घेऊ लागले. मधून मधून इंदु त्याचाच सल्ला घेई तर कधी कधी ते व इंदु मिळुन अण्णासाहेबांचा सल्ला घेत. इंदु या कामात झपाट्याने पारंगत झाली. मॅनेजरला व पेढीवरील सर्व नोकर वर्गाला दुरूप आला. सुरेशची पैशांची उचल अजून चालूच होती, त्याला मात्र इंदुने कधी अटकाव केला नव्हता.
        पण शेवटी तेही कराव लागलच. त्याला लागणारे पन्नास हजार एकरकमी देण्यास मॅनेजरने नकार दिला व ही गोष्ट इंदुच्या कानावर घातली. सुरेशला अडवल नसत तर व्यापारांत जो फटका बसणार होता त्याचा त्रास अण्णासाहेबांना होणार होता. शिवाय त्यांच्या व इंदुच्या प्रयत्नांमुळे व्यापारातली घसरण थोडी थोडी थांबली होती - ती सुरेशला पैसे देऊन टाकल्याने पुनः वाढणार होती. शेवटी इंदुने खंबीर पणाने निर्णय घेऊन टाकला. आज नाही तर कधीच नाही. तिचा, तिच्या संसाराचा जो कांही सोक्ष मोक्ष लागायचा असेल तो या वेळीच ठरू घालतच नाही, फक्त वारसाचा हक्क सांगून पैसा उचलतो, त्याचा मान मोठा आपण जी घराची प्रतिष्ठा, घराचा व्यापार आणी अण्णासाहेबांची प्रकृति जपण्याकरता जिवाच रान करतो त्या आपला मान --- हे आज या घराने ठरवलेच पाहिजे. शिवाय सून म्हणूनही तिचा कांही मान आहे. आपन सुरेशची पत्नी म्हणून तर आहेच आहे ! यावेळी सुरेशने अंगावर हात टाकायचा प्रयत्न केलाच तर आपण त्यांचा हात नक्की अडवायचा असाही इंदुने निर्धार केला.
      त्या रात्री सुरेश लौकरच घरी परतला आजही पिऊन नशेतच होता.  पण भांडण्या इतपत शुद्ध कायम ठेवली होती. अण्णासाहेबांच्या बेडरूमच्या बाहेरच इंदुने व डॉक्टरांच्या तापऱ्याने त्याला अडवले "जे कांही बोलायच असेल ते आपल्या रूम मधे चल आणी बोल. गोंधळ घालून अण्णासाहेबांचा त्रास वाढवायला परवानगी नाही!"
       त्याक्षणी सहानुभूती सुरेशला नव्हे तर अण्णासाहेबांना मिळणार होती.  सुरेश मुकाट्याने आपल्या खोलीकडे आला. पाठोपाठ इंदु ! आल्या आल्या त्याने इंदुला दंडाने धरले ! `"तू किंवा मी, कोणीतरी आत्ताचया आत्ता या घरातून निघायला पाहीजे ! अण्णासाहेबांना हा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल तू मला त्यांच्या खोलीत जाण्यासाठी अडवू नकोस. एकदा तुझं ऐकल ! आता तुला बजावून जातोय !"
       "जरा थांबा !" इंदुने झटंकन टेबलावरील पत्यांचा कॅट उचलला. "तुमच आयुष्य जुगारमय झालय आणि त्या नादांत तुम्ही आज बायकोला हाकलून द्यायला निघाले आहात ! जुगाराच्या पायी घराची अवस्था तुम्हाला दिसत नाही. तर मग तुम्हाला या कॅटचीच शप्पत  माझ्या बरोबर एक डाव खेळा. त्यांत आपण दोघं आपले सर्वस्व पणाला लावू. ज्याच नशीब बलवत्तर असेल तो जिंकेल.
       बोला, आहे का हा दावा मंजूर ? एक सच्चा जुगारी समोर आलेला चॅलेंज नाकारत नाही आणी आपल वचनही मोडत नाही! तुम्हाला आपल्या जुगाराची वृत्तीचा फार अभिमान आहे ! तर मग पन्नास हजारच कांय, अण्णासाहेबांची ही अफाट संपत्ति तुम्ही जिकूंन घ्या!"
        "ही नाटकं कशासाठी ? तुला पत्ते धड ओळखता तरी येतात कां ?
         तो माझा प्रश्न आहे. तुमचा नाही. असं समजा की आज अचावक पत्यांची एक लढ तुमच्याशी लढण्याची इच्छा आहे ! आठवत तुम्हाला ? लग्नाच्या पहिल्या दिवशीच मी तुमच्या पार्ट्यांची क्वीन होईल अस म्हणाला होतात तुम्ही ! ती मी होणार नाही ! पण तुम्ही किंग होणार की नाही ते ठरवण्यासाठी एक खेळी खेळण्याचा चान्स मला द्या ! एकदाच !
        होः होः करून सुरेश हसला ! " वाट पत्ते, एकदा जुगार जिंकून अण्णासाहेबांचा व्यापार सांभाळून घेतला होता ! आता तो व्यापार जिंकून घेतो ! शेजारच्या खोलीत माईसाहेब देवाची विनवणी करत होत्या. गेले चार-पात महिने इंदुला त्रास देण्याचा त्यांचा सोस वाढलेला होता !
अपुर्ण ११











कोई टिप्पणी नहीं: